आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.
जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.
खरे तर वारकरी संप्रदायाची निर्मिती ही शोष्णाच्या विरूद्ध एल्गार म्हणून होती. मनुवादी संस्कुतीची जोखडे तोडण्यास्तव केलेला प्रबोधनस्वरूपी किर्तनाचा जागर होता. धर्ममार्तंडांच्या जोखडातून भेाळया भाबडया अज्ञानी निरक्षर पिडलेल्या रयतेला मुक्तकरण्यासाठी चालविलेले ते मानवमुक्तीचे शांत व संयमी असे आंदोलन होते.याच वारकरी संप्रदायातील सूर्य म्हणून संताजी जगनाडे महाराजांचे नाव येते. एक क्रातीकारी पाऊल उचलणारे लढवय्येे योदधे म्हणून त्यांचे नाव शिल्पात कोरावयास हवे आहे.
तसा सर्व मराठवाडा आणी या मराठवाड्यातील जालना शहर म्हणजे करडी तेलाचे आगर होते. खेडो पाड्यात तर तेली वस्तीत, तेली गल्लीत, तेली आळीत सुर्यादया पुर्वीच घरोघरी तेल घाना सुरू होत असे. आगदी सुर्य मावळे पर्यंत. करडी तेल व करडी पेंउीची महाराष्ट्राची बाजारपेठ म्हणून जालन्याला नाव मिळाले होते. इथे ही घानी सुरूच होती. तसा सर्व माल इथे विक्रीला येत असे. आणी होलसेल खरेदी साठी महाराष्ट्र जालन्याला येत असत इतकी भरभराट या बाजार पेठेची झाली होती. या बाजारपेठेत श्री. शंकरराव यांचे आजोबा आले. खेडोपाड्यातून आलेला माल आडतीवर विकू लागले. शंकररावाचे वडील आनंदराव हाच व्यवसाय करीत होते. तसा 1972 चा दुष्काळ 1965 पासुनच सुरू होता. त्याने उग्र रूप 1972 ला जरूर धारण केले होते.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 3) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
वरिल तीन नावे वाचल्या नंतर जरा वेगळेच वाटले असणार. हे तिघे ही एकाच काळातील. मी तेली आहे. माझे पुर्वज तेली होते. माझ्या नंतरचा वशंज तेली असणार आहे. त्यामुळे या व्यवस्थे विरोधात मी लढणार आणी मी लढून या व्यवस्थेला संपवणार ही ध्येय संताजींची होती. आणि म्हणून त्यांनी ब्राम्हण धर्मानुसार किंवा ब्राम्हण कायद्याप्रमाणे व मुसलीम सत्तेत अधीकार पदावर राहून संत तुकारामांना शिक्षा दिली. या शिक्षेला अपील नव्हती. या शिक्षेला मुसलीम सत्ता ढवळा ढवळ करीत नव्हती तर ब्राह्मणी सरदारांना उलट संरक्षण देत होती. आशा वेळी हा ब्राह्मणी कायदा मोडायचा ठरवला तो प्रथम इतिहासात संत संताजींनी.
संत संताजींच्या मारेकर्यांचे पोवाडे गातो तेव्हां - (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आपल्या प्रेरणा स्थाना विषयी. आपल्या तेजा विषयी, आपल्या ताकदी विषयी आपल्या शक्ती विषयी जेंव्हा पुर्ण माहिती आसते तेंव्हा आपल्या त्या आदर्श व्यक्ती विषयी जागृत आसतो आणी ही जागृती आपल्याला आपल्या व्यक्तीच्या विचार धारेच्या प्रवाहात नेहते. आपण त्या व्यक्तीच्या कार्यापर्यंत घेऊन जातो आणी ती जर बोथट असेल चुकीची ही असेल तर त्या महामानवाच्या वैचारीक ठेवणीला आपन दफन करून फक्त त्यांच्या नावावर दुसर्यांने जे खपवले त्याचे डावपेच न ओळखता आपन फक्त भार वहाणारे ठरतो. हा भार त्या व्यक्तीच्या नावेे आसतो पण आत जे आसते ते त्या व्यक्तींच्या नावे नसतो या नंतर असा काळ येतो की आपन भक्त बनतो. आणी त्या व्यक्तीला कुटील डावात संपवणार्यांचे पोवाडे गातो. वस्तुस्थीती अशी असते की एकदा का आपन भक्त बनलो की पुजनातच गुंग होतो.