नागपुर नंदनवन येथे संत जगनाडे महाराज यांचे स्मारक तयार करण्यात आले. संताजींचे कार्य आणि उपदेश सातत्याने समाजाच्या समोर राहावा आणि त्यांच्या विचारांवर जगण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. विठ्ठलराव खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. संताजींच्या हातात लेखणी आहे आणि ते लिहित असल्याचे दृश्य साकारणारा हा पुतळा संपूर्ण भारतात एकमेव आहे.
नागपुर तेली समाज जवाहर विद्यार्थी गृहाच्यावतीने या महिला मंचाची स्थापना करण्यात आली. महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य मंचद्वारे करण्यात येते. विविध स्पर्धा, उपक्रम, व्याख्यानमाला, शिबिरे आदींचे आयोजन मंचतर्फे करण्यात येते.
नागपुर - प्रत्येक जातीत साडेबारा उपशाखा असतात. जातीभेद आणि त्यानंतर शाखांमधील भेदांनी समाज अधिक विखुरतो. संत जगनाडे महाराजांनी जातीप्रथेचाच निषेध नोंदविला होता. किमान जातीमधील उपशाखांमध्ये संघर्ष नसावा म्हणून समता परिषद कार्य करते.
प्रामुख्याने तेली समाज मोठय़ा प्रमाणात पूर्व नागपुरात आहे. पण बदलत्या काळात अनेक तेली बांधव पश्चिम नागपुरात स्थायिक झाले. विखुरले गेल्यामुळे त्यांचा समाजाशी असणारा संबंध-संपर्क कमी झाला. समाज एकसंघ राहावा, या हेतूने ही संघटना शंकरराव भुते यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.
नागपुर सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. विवाहात प्रचंड खर्च होतो, त्यामुळे पालक हवालदिल होतात. अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांची आयुष्यभराची पुंजी मुलांच्या विवाहात संपून जाते. यावर तोडगा काढण्यासाठी संताजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सामूहिक विवाहाची संकल्पना जवाहर विद्यार्थी गृहाच्या साह्याने तयार करण्यात आली.