नागपुर तेली समाज सभेच्यावतीने समाजातील महिला व विद्यार्थ्यांंसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांंना शैक्षणिक मदत करण्याचा मानस आहे. मिरची बाजार, इतवारी येथून हे कार्य करण्यात येत आहे.
समाजातर्फे (अंबाळा) रामटेक आणि गरोबा मैदान, नागपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आली आहे. व्यवसाय हा उद्देश यामागे नसून समाजातील गरीब नागरिकांना कमी दरात राहण्याची व्यवस्था करून देण्याचा मानस यात आहे. याचे अध्यक्ष हिरामण बावनकुळे, उपाध्यक्ष बळवंतराव ढोबळे आणि सचिव खुशालराव पाहुणे या धर्मशाळांचे व्यवस्थापन पाहत आहेत.
नागपूर - जवाहर विद्यार्थी गृह म्हणजे तेली समाजाच्या मान्यवरांनी एकत्रित येऊन केलेली महत्त्वाची समाजसेवा आहे. समाजातील विद्यार्थ्यांंना शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी आणि त्यांच्यावर महाविद्यालयीन जीवनात चांगले संस्कार व्हावेत, या उद्देशाने जवाहर विद्यार्थी गृहाची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थी गृह, वाचनालय, व्यायामशाळा बांधण्याचा संकल्प करण्यात आला.
दि. आठ डिसें सोळा ला संताजी जगनाडे महाराज जयंती औचित्यानं भरारी प्रकाशन नागभीड द्वारा संताजी जगनाडे एक योद्धा हया संताजीच्या जीवनचरित्रावरील पहिल्याच कादंबरीचं प्रकाशन झालं. कादंबरीच्या लेखनाला साजेसं बंसी कोठेवार चित्रकार यांचं सुशोभित करणारे मुखपृष्ट लाभलेलं असून लेखकाचे कादंबरीच्या अंतरंगाच्या गाभ्याचे प्रकटन म्हणजे मलपृष्ठ होय.
आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर जर शिल आणि शरिर कमविले नाही तर बाकीचे सर्व कमविलेले व्यर्थ आहे. आणि म्हणुन आपण आपले शरिर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील वात, पित, कफ हे तीन दोष संतुलित ठेवणे गरजेचेे असते. खरा आरोग्यवंत तोच ज्याचे वात, पित्त, कफ, मन, बुद्धी व कर्म हे सहाही संतुलीत असतात.
जगात सर्वात जास्त आजार वात दोष बिघडल्यामुळे होतात. ते होऊ नयेत म्हणुन आपण शरिरातील वात दोष संतुलित ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. वात दोष संतुलित ठेवण्यासाठी सर्वांत चांगले खाद्यपदार्थ आहे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल.