Sant Santaji Maharaj Jagnade
नागपुर - संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य दिनांक १७/१२/२०१७ रोज रविवारला मालेवाडा ता. भिवापूर येथे कार्यक्रमाचे उदघाटन मा. श्री.रामदासजी सहारे, मा.श्री. प्रशातभाऊ कामडे, मा.प्रा.विठ्ठलरावजी निकुरे, मा. श्री.रामुजी सहारे, मा.डाँ.परसरामजी नागोसे, मा.श्री.दीपकभाऊ निकुरे, मा.श्री.अशोकभाऊ चौधरी ,व समाज बांधव मोठ़या संख्येने उपस्थित होते.
संताजी स्नेही मंडळ, भद्रावती, जि. चंद्रपूर तेली समाज द्वारा आयोजित
श्री संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव 2018
भव्य शोभा यात्रा
तथा पारिवारीक परिचय मेळावा
नागपुर तेली समाजातील नागरिकांना एकत्रित करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी महासभा कार्यरत आहे. विविध उपक्रम, व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि समाजाची उन्नती साधण्यासाठी महासभा काम करीत आहे. यात रामदास तडस, कृष्णा हिंगणीकर, ईश्वर बाळबुधे, सतीश देऊळकर कार्य करीत आहेत.
नागपुर नंदनवन येथे संत जगनाडे महाराज यांचे स्मारक तयार करण्यात आले. संताजींचे कार्य आणि उपदेश सातत्याने समाजाच्या समोर राहावा आणि त्यांच्या विचारांवर जगण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. विठ्ठलराव खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. संताजींच्या हातात लेखणी आहे आणि ते लिहित असल्याचे दृश्य साकारणारा हा पुतळा संपूर्ण भारतात एकमेव आहे.
नागपुर तेली समाज जवाहर विद्यार्थी गृहाच्यावतीने या महिला मंचाची स्थापना करण्यात आली. महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य मंचद्वारे करण्यात येते. विविध स्पर्धा, उपक्रम, व्याख्यानमाला, शिबिरे आदींचे आयोजन मंचतर्फे करण्यात येते.