Sant Santaji Maharaj Jagnade
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 6) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
होय मी तेली आहे. मी आहे तो आहे. माझे मत तेली मत आहे. स्वातंत्र्यात सत्ते पासुन तुम्ही दुर ठेवू शकत नाही. लोकशाही म्हणजे, समता सांगते. परंतु निवडणूकीच्या फडात आमची मते हवी असतात. विकासाची साधी पाऊल वाट ही समाजाला देत नाहीत ही त्यांची खरी पोटतीडीक विधान परिषदेत ते त्याच भुमीकेने वागत. स्वातंत्र्य उत्तर काळात देशपातळीवरील सुज्ञ बांधवांनी भारतीय तैलीक साहु महासभा स्थापन झाली होती. तिचा विस्तार महाराष्ट्रात डिंग्रजचे आमदार माधवराव पाटील यांनी सुरू केला. प्रथम ही संघटना विदर्भात मुळे रोवुन उभी राहिली. समाजमाता केरकाकु क्षिरसागर यांनी मराठवाड्यात प्रांतिक अध्यक्ष म्हणुन उभी केली.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 5) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
संघटना, चळवळ, प्रश्नाची सोडवूक ही श्री. रामसजी यांची ठेवण लग्ना ंनंतर ते आपले घर व शेती पहात असताना कुस्ती बरोबर आसत. या विदर्भातील पैलवान महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे यासाठी त्यांनी देवळी येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र ही सुरू केले. यातुन वर्द्याचापैलवान घडावा देवळीचा प्रकाश राज्यात पडावा ही धडपड. आशा वेळी 1983 मध्ये सहकार महर्षी बापुरावजी देशमुख हे तडसांच्या कडे आले. वाटचाल महीत होती. धडपड माहित होती. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे श्री. रामदासजी यांची वाटचाल त्यांनी अनुभवली होती. तांबड्या मातीतला हा पैलवान सहकारात आला तर तळातल्या माणसा पर्यंत लाभ जावू शकेल ही त्यांची इच्छा होती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीची निवडणूक जवळ आली होती.
तैलिक वैश्य समाज सभा सामुहिक विवाह सम्मेलन आयोजी किया गया है । सभी समाज बांधव सादर आमंत्रित है । दिनांक 21 मई 2016 शनिवार, समय प्रातः 7 बजेसे । स्थान श्रमजीवी महाविद्यालय, पेट्रोल पम्प मे पीछे, वैशाली नगर, अजमेर,
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 4 ) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
आणीबाणीच्या काळातच त्यांचे कॉलेज शिक्षण सुरू होते लोकशाहीची झालेली परवड त्यांनी पाहिली होती. शिक्षण पुर्ण होताच देवळी येथे ते आले. दमलेल्या वडीलांच्या बरोबर शेतीत त्यांनी लक्ष घातले. तांबड्या मातीत ते रमले दि.16 जुन 1977 मध्ये सौ. शोभाताई यांच्या बरोबर विवाह झाला संत गाडगे बाबा यांच्या सामाजीक परिवर्तनाचा वसा बाळगणारे चहु बाजुची माणसे ओळखून त्यांच्याशी मैत्री ठेवणारे आपले वृद्ध आई वडिल यांची काळजी घेणारे. मी घराचा कर्ता आहे याची जाणीव ठेऊन धडपडणरे कुस्ती हा तडसांचा पिंड आहे.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 3) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
देवळी गावात शिक्षण घेता घेता खेळ खेळताना मनात अजुन एक गोष्ट नोंदवली गेली. कबड्डी, खोखो या सारखे खेळ सांघीक आहेत तर कुस्ती हा खेळ मुळात एकट्या पुरता आणी मराठी मातीचा हा मर्दानी खेळ. ते गावातील आखाड्यात रमु लागले जोर बैठका करीता करीता ते तांबड्या मातीत उतरले. या मातीत चितपट कुस्ती करिताना डावपेच लागतात. समोरचा ही तसाच आसतो. तो तसा आसतो म्हणुन त्याच्या डावाला प्रती डाव करणे यातच यश आसत. आगदी एस.एस.सी. परिक्षा उतर्रण होई पर्यंत ते तांबड्या मातीत असत. अजुबाजुच्या कुस्त्यांच्या फडावर ते सामील होत. आपल्या तयारीची चुणूक दाखवत आसत. चंद्रभानजी तडस यांनी आपल्या मुलाचे गुण हेरले.