एका सरपंचाचा दिवसा ढवळ्या खुन. एका नगरसेवकाचा दिवसा खुन. या बाबत नेते म्हणुन घेणार्यांनी आज पर्यंत कुठे ब्र काढला नाही. प्रश्न स्थानिक आहे. मध्यंतरी मोदी यांची ही पडद्या मागुन जात रस्तयावर आणली होती. इकडे विरोधा पेक्षा अभिमानाने सांगतो मोदी तेली आहेत. या पुर्वी आठवले यांचे उदाहरण याच साठी दिले. त्यांचया धोरणा विषयी माझी काही मते जरूर आहेत. पण त्यांनी जे साध्य केले त्या विषयी मते नाहीत. नुसतीच भाटगीरी करून काय मिळवले ? आज ओबीसी आरक्षणा विषयी भागवतासह काही जन जे बोलतात आज न्याय पालिकेचे एक न्यायधीश मत मांडतात देशाला भ्रष्ट्राचार व आरक्षण ही किड आहे. ही बोलण्याची ताकद 12 टक्के तेली समाजाने दिली.
स्वातंत्र्य लयास घालवतांना बर्वे नावाच्या व्यक्तीने स्वराज्याचा ध्वज उतरवुन युनियन जॅक फडकवला. सातरच्या गादीवर लक्ष देण्यास याच बर्वेंना पाठविले. काही वर्षात छत्रपतींना देशो धडीस लावणारे हेच बर्वे होते. हा इतिहास आहे. तो कोणत्याच शालेय अभ्यासक्रमात येऊ दिला जात नाही. हे का मांडायचे तर या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भिल्ल, सोनार, रामोशी, कोळी या मंडळींनी पेशवाई संपुष्टात येताच प्रखर लढा दिला. यातील हजारो जनांना गोळ्यांच्या वर्षावात मरण इंग्रजांनी दिले. त्यांचा ही इतिहास कुठे शिकवला जात नाही. संत संताजी, नमाजी माळी, गवार शेठ या सारख्या मंडळींनी संत तुकोबा बरोबर राहून शिवराया साठी ही भुमी अनकुल केली. परंतु इतिहासाची फारकत घेऊन संत रामदासांना शिवरायांचे गुरु बिंबवले जाते.
युवा प्रकोष्ठ साहू समाज छत्तीसगढ़ के तत्वावधान में आज दिन शनिवार को खुर्सीपार भिलाई के कर्मा माता मंदिर में सामाजिक भाई बंधुओं के द्वारा पूजा अर्चना का कार्यक्रम किया गया जिसमें प्रमुख रूप से छत्तीसगढ़ युवा प्रकोष्ट प्रदेश संगठन सचिव प्रेमकिशन साहू जी,प्रदेश युवा प्रकोष्ठ सयुक्त सचिव सूरज साहू जी संतोष साहू , रितेशजी, अंकुश साहू जी समीर साहू जी,कमलेश साहू जी
महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासाचा ठेका घेतलेली संघटना व या संघटनेचे हाय कमांड ते पदाधिकारी एका तालात एका सुरात नेहमी एकच गाणे वाजवतात. आम्ही बारा टक्के आहोत. आम्ही तुमचे बारा वाजवु शकतो. या गाण्यातील हे जे कडवे आहे. ते मात्र सत्य आहे. कारण या कडव्यात खरी ताकद आहे. पण जसे हे गाणे लांबत जाते तसे समाजाचा शेवटचा बांधव त्याच गाळात अधीक रुतु लागतो. तेंव्हा उरते फक्त कडवे आणी याचा गाभा हवेत विरला जातो.
पुणे - महाराष्ट्र तैलीक महासभा ही गट, तट, भेद, हेकेखोर यात न गुंतता ती समाजाची रक्त वाहिनी बनावी या साठी तेली गल्ली मासिकाने विपुल लेखन केले. कारण ही समाजाची संघटना आहे. ती दुफळीत गुंतून समाजाचे नुकसान होऊ नये म्हणुन चांगल्या बाबींचे कौतुक व चुकांचा पंचनामा मांडला. काही सुज्ञ मंडळींनी ही आपले विचार इतर प्रसार माध्यमातुन मांडले. त्याला चांगले फळ येऊ लागले. समाजातील जेष्ठ बांधवांची सह विचार सभा मुंबई येथे संपन्न झाली. या ठिकाणी समाजात दुफळी होऊ नये म्हणुन मते मांडून त्या बाबत निर्णय प्रक्रिया सुरू झाली. त्या ठिकाण उपस्थीत असलेल्या मा. सौ. प्रिया महिंद्रे यांनी दिली. कारण तेली गल्ली हे मासीक हे शक्य तो संतुलन साधण्याचा प्रमाणिक प्रयत्न करते. कदाचीत आमची चुक असेल तर कळवा त्या विचारांना ही प्रसिद्धी देऊ.