नेवासा - येथिल अडत व्यापारी श्री. देवीदास सदाशीव साळुंखे यांची भानस हिवरेया ग्रा. पं. मध्ये नुकतीच निवड झाली आहे. नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर संचालक म्हणुन आमदारांनी शिफारस केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड मार्केट कमिटीवर केली आहे. या पुर्वी या मार्केट कमीटीच व्हाईस चेअरमन ही होते. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
पिंपरी :- श्री. संताजी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. ढेंगाळे यांना महाराष्ट्र तेली महासभेचे मुख्यसचिव श्री. भुषण कर्डीले व महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. गजानन शेलार यांनी पिंपरी चिंचवड शहराचे काम पहाण्यास फोन वरून सुचना दिल्यात. या शहराची जबाबदारी संभाळण्यास सांगीतले असुन. पिंपरी चिंचवडची खाणे सुमारी अद्यावत करण्यास कार्यकर्ते कामाला लागलेत असे श्री. विष्णुपंत ढेंगाळे यांनी सांगतीले.
स्वातंत्र्यातील योद्धा संत जोगापरमानंद व आमचे नेभळटपण (भाग 6) - मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
स्वातंत्र्यात आज ही आपण कोन आहोत याची ओळख जेंव्हा होते तेंव्हा गुलामगीरीचा रस्ता सुरू होतो. हे वास्तव आहे. समाजा अंतर्गत संघटनेच्या नावा खाली जेव्हां विघटन करणारे एक केंद्र निर्माण होते तेव्हा समाजात वाद निर्माण होतो. समाजअंतर्गत मतात भेद निर्माण होऊन ज्यांना पारतंत्र्य लादावयाचे आहे त्यंना आपण आमंत्रणच देत आसतो. अशी सब कुछु वृत्ती नव्हे तर विकृती जेंव्हा प्रतिकृती म्हणुन समोर येते तेंव्हा चार शब्द मांडावे लागतात. समाजाच्या अंतर्गत प्रश्नाला भिडणारे निर्माण करण्यापेक्षा समाज बाहेरील शक्तींना भीडणारे बनवा आणी ही नेहमी प्रमाणे मी पुहा एक गुन्हा या निमित्ताने करीत आहे.
दिनांक 8 जानेवारी 2016 रोजी नंदुरबार शहरात संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त तेली समाजाने भव्य शोभा यात्रा काढण़्यात आली होती. यावेळी तेली समाजातील 9 ते10 हाजार समाज बाधवांनी शोभा यात्रेत भाग घेतला होता.
संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्री संत जगनाडे महाराज तेली संस्था आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आ.जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती दर्शविली.