Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे - श्री. संताजी सेनेच्या इंदिरानगर बिबवेवाडी परिसर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन जोशी, अँड. अभय छाजेड, नगरसेवक, दिनेश घाडवे, गणेश घुले उपस्थित होते.
या प्रसंगी रामदास धोत्रे, रमेश भोज, दीपा व्यवहारे, प्रीतम केदारी, राधिका मखामले, निशा करपे, कल्पना उनवने, सीमा पवार, विजय हाडके, जिवय मखामले , पोपट गंधाले, दत्तात्रय पवार, शरद पिंगळे, सुय्रकांत बारमुख, श्यामराव भगत, सुनिल राऊत जयवंत मखामले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भविष्यात तरूणांना रोजगार मिळवून देणार्या विविध योजना राबविण्याचा मानस या संताजी सेनेचा आहे. संताजी सेनेची गोपालन योजनाही सुरू आहे. समाजातील ग्रामीणा भागातून ही योजना चांगल्याप्रकारे राबविता येऊ शकते. ग्रामीण भागातील तरूणांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्याकडे गायी सांभाळण्याची क्षमता असेल, यासाठी जागा उपलब्ध असेल तर जरूर या योजनेचा लाभ घ्यावा.
श्री संताजी सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष अनिल उबाळे यांच्या मातोश्री कै. सौ. जयश्री बबन उबाळे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. संताजी सेना व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यामने आयोजित कलेल्या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ४०० गरजूंनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी १५० गरजूंनी नेत्र तपासणी करून घेतली. यातील ४ व्यक्तींची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी नाममात्र दरात चष्मे देण्यात आले.