संताजी जनसेवा मंडळ, हिंगणघाट
जिल्हा वर्धा तेली समाज वर - वधु नोंदणी अर्ज
तेली समाजातील सगळ्या शाखेतील समाज बंधु व भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, संताजी जनसेवा मंडळ, हिंगणघाट, द्वारे हिंगणघाट येथे दर एक वर्षाच्या अंतराने तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा घेण्यात येत आहे.
गोंदिया - ग्राम खोपडा बयवाड, ता. तिरोड, जि. गोंदिया श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्ताने मौजा खोपडा येथे जागृती व दिप प्रज्वल्न दि. 19/12/2017 रोजी मंगळवारला सायं. 7.30 वा. श्री. ह. भ.प. पुरूषोत्तमजी महाराज यांचे शुभहस्ते व रात्री 9 वाजता जागृतीपण किर्तन श्री ह. भ. प. पुरूषोत्तम महाराज मु. बपेरा यांचे जाहीर किर्तन
नागपुर तेली समाजातील नागरिकांना एकत्रित करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी महासभा कार्यरत आहे. विविध उपक्रम, व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि समाजाची उन्नती साधण्यासाठी महासभा काम करीत आहे. यात रामदास तडस, कृष्णा हिंगणीकर, ईश्वर बाळबुधे, सतीश देऊळकर कार्य करीत आहेत.
प्रामुख्याने तेली समाज मोठय़ा प्रमाणात पूर्व नागपुरात आहे. पण बदलत्या काळात अनेक तेली बांधव पश्चिम नागपुरात स्थायिक झाले. विखुरले गेल्यामुळे त्यांचा समाजाशी असणारा संबंध-संपर्क कमी झाला. समाज एकसंघ राहावा, या हेतूने ही संघटना शंकरराव भुते यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.
समाजातर्फे (अंबाळा) रामटेक आणि गरोबा मैदान, नागपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आली आहे. व्यवसाय हा उद्देश यामागे नसून समाजातील गरीब नागरिकांना कमी दरात राहण्याची व्यवस्था करून देण्याचा मानस यात आहे. याचे अध्यक्ष हिरामण बावनकुळे, उपाध्यक्ष बळवंतराव ढोबळे आणि सचिव खुशालराव पाहुणे या धर्मशाळांचे व्यवस्थापन पाहत आहेत.