नागपुर तेली समाजातील नागरिकांना एकत्रित करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी महासभा कार्यरत आहे. विविध उपक्रम, व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि समाजाची उन्नती साधण्यासाठी महासभा काम करीत आहे. यात रामदास तडस, कृष्णा हिंगणीकर, ईश्वर बाळबुधे, सतीश देऊळकर कार्य करीत आहेत.
प्रामुख्याने तेली समाज मोठय़ा प्रमाणात पूर्व नागपुरात आहे. पण बदलत्या काळात अनेक तेली बांधव पश्चिम नागपुरात स्थायिक झाले. विखुरले गेल्यामुळे त्यांचा समाजाशी असणारा संबंध-संपर्क कमी झाला. समाज एकसंघ राहावा, या हेतूने ही संघटना शंकरराव भुते यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.
समाजातर्फे (अंबाळा) रामटेक आणि गरोबा मैदान, नागपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आली आहे. व्यवसाय हा उद्देश यामागे नसून समाजातील गरीब नागरिकांना कमी दरात राहण्याची व्यवस्था करून देण्याचा मानस यात आहे. याचे अध्यक्ष हिरामण बावनकुळे, उपाध्यक्ष बळवंतराव ढोबळे आणि सचिव खुशालराव पाहुणे या धर्मशाळांचे व्यवस्थापन पाहत आहेत.
दि. आठ डिसें सोळा ला संताजी जगनाडे महाराज जयंती औचित्यानं भरारी प्रकाशन नागभीड द्वारा संताजी जगनाडे एक योद्धा हया संताजीच्या जीवनचरित्रावरील पहिल्याच कादंबरीचं प्रकाशन झालं. कादंबरीच्या लेखनाला साजेसं बंसी कोठेवार चित्रकार यांचं सुशोभित करणारे मुखपृष्ट लाभलेलं असून लेखकाचे कादंबरीच्या अंतरंगाच्या गाभ्याचे प्रकटन म्हणजे मलपृष्ठ होय.
आम्ही घडलो खासदार रामदास तडस साहेबा मुळे - चंद्रकांत वाव्हळ, पुणे विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा
वृत्तीने पैलवान एक खेळाडू तिन विदर्भ केसरी पद मिळवलेले खेळ हा पिंड जोपासलेला. या तांबड्या मातीत शिकले यश मिळवता येते पण पहिले अपयश मिळवले पाहिजे. हे अपयश पचवता आले पाहिजे या अपयशातुन बरेच शिकता आले पाहिजे. यश हवे असेल तर या जोडीला आपल्या माणसाचा विश्वास ही शिदोरी मिळवता आली पाहिजे. ती मिळवली खा. तडस साहेबांनी त्यांच्या वाटचाली कडे पाहिले तर एक ठळक गोष्ट नजरे आड करता येत नाही मुळात तडस हे घराणे यवतमाळ मधील खेडगावातील या खेडेगावात त्यांच्या वडीलाकडे शेती होती.