आ. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरथ असलेली देश पातळीवरील तैलिक साहू महासभेची मिटींग जवाहरलाल वसतीगृह नागपूर येथे 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या साठी देश पातळीवरील बांधव उपस्थीत रहाणार आहेत. तरी सर्व सभासद बंधुंनी व समाज बाधवांनी 19 मार्च रोजी जवाहर वसतीगृह नागपूर येथे उपस्थीत रहावे असे अवाहन मा. ईश्वर बाळबुधे यांनी आपल्या पुणे दौर्यात व्यक्त केले.
वर्धा - येथिल तेली समाजीतील युवक श्री. सारंग रघटाटे यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श युवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने सदरचा पुरस्कार मुंबई येथे आयोजीत केला होता. ना. विनोद तावडे शिक्षण व युवक कल्याण मंत्री यांच्या शुभ हास्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. श्री. सारंग यांचे अभिनंदन खासदार रामदास तडस यांनी केले आहे. सर्व बांधवा तर्फे शुभेच्छा.
खासदारकीचा मी पणा विसरून वावरणारे खा. तडस :- उमेश साहू नागपूर
आमच्या 2/3 पिड्या विदर्भाच्या मातीत मुरलेल्या. या मातीने आपलेसे केलेले. या वावरण्यात समाजाचे आमदार म्हणून तडस साहेबांची ओळख झाली. आमच्या आडचनी समजावून घेतल्या त्या आडचनीवर चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. एक तेली म्हणून ते आमचे झाले. तेली समाजाच्या संघटनेत त्यांनी सामावून घेतले. त्यांचा जेंव्हा परिचय झाला तेंव्हा मी कोण विसरून आपण सर्व एक आहोत ही भुमीका ते वागण्यात बोलण्यातुन प्रकट करीत
खासदार तडस साहेबांनीच समाज संघटीत केला - संजय टेकाळे जामखेड
आमच्या नगर शहरात खा. रामदासजी तडस साहेबांना समाजाचे अध्यक्ष पद महाराष्ट्राचे मिळाले. आणि आज खर्या अर्थाने समाज जागा करून संघटीत केला ते राजकीय क्षेत्रात खासदार झाले. उद्या केंद्रीय मंत्री होतील. परंतू यासाठी त्यांचे कष्ट ही आम्हा बांधवांची शिदोरी आहे. तसा माझा त्यांचा कार्यक्रम पुरता संबंध आला परंतू समाज म्हणजे काय ? संघटन म्हणजे काय हे शिकता आले.
चंद्रपूर संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात लावण्यात आलेली फलक मनपा प्रशासनाने काढले. यावर आक्षेप घेण्यात आला असून मनपा प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक आकाश साखरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.