दिनांक ५/६/२०१६ रोज रविवार ला चंद्रपुर जिल्हा कार्यध्यक्ष डॉ परसराम नागोसे यांच्या अध्यक्ष खालि व विदर्भ अध्यक्ष प्रशांत भाऊ कामडे यांच्या उपस्थितित नागभिड एरंडेल तेलि समाजा च्या अध्यक्ष पदी रमेशराव ठाकरे तसेच सचिव पदि आनंदराव भरटकर यांचि निवड झालि त्या बद्दल हादि्क शुभेच्छा शुभेच्छुक नागपुर जिल्हा येरंडेल तेली समाज हितकारणी मंडळ व अभिनय लाखडे, दिनेश चौधरी व विशाल कैकाडे
तेली समाजाचा १३वा सामूहिक विवाह सोहळा जवाहर विद्यार्थी गृह, नंदनवन कालोनी, नागपूर
येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला तेली समाजाचे सर्व आजी माजी नेत्यांनी आपली उपस्थित दाखवली. या वेळी समाजाचे जेष्ठ व श्रेष्ठ नेते व माजी आमदार माननीय श्री बळवंतराव ढोबळे, नागपूरचे खासदार व मंत्री माननीय नितीनजी गडकरी , आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्री रामदास तडस, वर्धेचे माजी खासदार सुरेश वाघमारे, समाजाचे नेते श्री बाबूराव वंजारी, श्री रमेश गिरडे, श्री हिरामणराव बावनकुळे, विवाह समितीचे अध्यक्ष रामुजी वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 7) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
पुलगाव येथिल बाजार समीतीच्या सदस्य होऊन केली सुरूवात. नगराध्यक्ष, आमदार, खासदार या प्रवासात चढउतार हे खेळाडु वृत्ती असल्याने ते पुन्हा गरूड भारारी घेत आसतात. तेली समाज ही एक ताकद आहे. ती ताकद ओळखून ते समाजात गेले. एक आमदार एक खासदार आपल्या जवळ येतात. सुख दु:खाची पाठराखण करतात. सामाजीक प्रश्न समजुन घेतात. सामाजीक प्रश्नाची जाण ठेवतात.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 5) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
संघटना, चळवळ, प्रश्नाची सोडवूक ही श्री. रामसजी यांची ठेवण लग्ना ंनंतर ते आपले घर व शेती पहात असताना कुस्ती बरोबर आसत. या विदर्भातील पैलवान महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे यासाठी त्यांनी देवळी येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्र ही सुरू केले. यातुन वर्द्याचापैलवान घडावा देवळीचा प्रकाश राज्यात पडावा ही धडपड. आशा वेळी 1983 मध्ये सहकार महर्षी बापुरावजी देशमुख हे तडसांच्या कडे आले. वाटचाल महीत होती. धडपड माहित होती. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे श्री. रामदासजी यांची वाटचाल त्यांनी अनुभवली होती. तांबड्या मातीतला हा पैलवान सहकारात आला तर तळातल्या माणसा पर्यंत लाभ जावू शकेल ही त्यांची इच्छा होती. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीची निवडणूक जवळ आली होती.
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 4 ) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
आणीबाणीच्या काळातच त्यांचे कॉलेज शिक्षण सुरू होते लोकशाहीची झालेली परवड त्यांनी पाहिली होती. शिक्षण पुर्ण होताच देवळी येथे ते आले. दमलेल्या वडीलांच्या बरोबर शेतीत त्यांनी लक्ष घातले. तांबड्या मातीत ते रमले दि.16 जुन 1977 मध्ये सौ. शोभाताई यांच्या बरोबर विवाह झाला संत गाडगे बाबा यांच्या सामाजीक परिवर्तनाचा वसा बाळगणारे चहु बाजुची माणसे ओळखून त्यांच्याशी मैत्री ठेवणारे आपले वृद्ध आई वडिल यांची काळजी घेणारे. मी घराचा कर्ता आहे याची जाणीव ठेऊन धडपडणरे कुस्ती हा तडसांचा पिंड आहे.