जेवणावळी, ओळखी, नाते संबंधात संपर्क, भाषण बाजी या परिघा बाहेर समाजाचे कार्यक्रम जात नाही. मानपान, प्रसिद्धीचा ढोल श्रिमंतीचे प्रदर्शन मोठे पणाची हौस मिरवणे, यातुन मतभेद ही या कार्यक्रमांची कार्यक्रम पत्रिका आसा हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसर्या शहराच्या कार्यक्रमा पर्यंत शांतता. कारण इथे मी हेच आसते. कारण इथे पळवाट ठेवुन वावरणे आसते कारण इथे खरा संघर्ष कोणाबरोबर आहे. याची साधी जाणीव ही दिलेली नसते. त्यामुळे संघर्ष होत नसतो. संघर्ष नसल्यामुळे इथे समाजाच्या आणि त्यांचया ही पदरात काहीच पडत नसते.
पण लक्षात राहते श्रीमती धोत्रे यांचे भविष्याचे वेध घेणारे कार्य. सोहळ्यास लोटणार्या जनलसमुदायाचे जेवण बनविण्यास भांडीच नव्हती. ती जवळ जवळ सुरूवातीस देण्याचे काम यांनी केले. याचबरोबर पालखी सोहळ्याचा इतिहास हा असाच संपेल. हे महान कार्य करणारी जी जी माणसे होती. ती ती माणसे अंधारात राहू नयेत अशी इच्छा हा सोहळा सुरू झाल्यापासून होती. तो इतिहास जपला जावा यासाठी ४ ते ५ हजार खर्च करून हा इतिहास छापील केला.
धोंडिबा राऊत व दादा भगत यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या पांडुरंगाच्या भेटीसाठी किती दिव्य केले. त्या दिव्याचे जे फळ आले ते फळ पाहुन त्यांना जसा आनंद होत होता तसेच पालखीबरोबर आलेले व इतर गोळा झालेले हरिभक्त आनंदी झाले होते.
पुन्हा पालखी पांडुरंगाच्या देवळातून गावाबाहेर निघाली. फाट्यापर्यंत अभंगाचा गजर करीत गावकरी आले. या फाट्यावर निरोप दिल्यावर बाकी उरले पाच सहा लोक. ही मोजकी पण निवडक त्यागाची, जिद्दीची निष्ठेची माणसे उरली. जाणारी येणारी विचारीत जरा थांबत एवढीच माणसे म्हणुन चालू लागत. पण ही माणसे खचली नाहीत. दमली नाहीत. हरली नाहीत की पुन्हा परतली नाहीत. वरून पडणारा पाऊस अंगावर घेत चाकण जवळ करीत होती.
माऊलीच्या मुक्काम ज्या ज्या तळावर असेल तेव्हा ते वेळ काढून अनेक दिंड्यात जाऊन त्यांच्या प्रमुखांना भेटत ज्यांचा उल्लेख करावा अशा दिंड्या ह्या की, चांगा वटेश्वर, सोपान काका महाराज, चौरंगी महाराज या व इतर पालख्यांच्या नेते मंडळींनी मार्गदर्शन केले.