Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

शेतात राबता राबता क्षितीज रूंदवता येते.

आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 2) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र

    वर्धा ते यवतमाळ रस्त्यावर देवळी एक छोटे गाव या गावात चंद्रभानजी तडस व कौशल्याबाई या कुंटूंबात त्यांनी जन्म घेतला. घराला घर पण येण्यासाठी पुर्वपार असलेल्या शेतीत राबावे. लहरी पावसाच्या भरवश्यावर जे मिळेल त्यावर घर चालवावे घरातील पेटती चुल विझु नये ही मात्र दोघांची धडपड रोजची आसे. देवळीच्या प्राथमीक शाळेत ते शिकत होते. शाळेला सुट्टी असेल तेंव्हा रामदासजी आई बरोबर शेतात जात. आगदी एप्रिल, मे चे कडकडीत उन्ह ही अंगावर झेलत आसत. 

दिनांक 01-04-2016 10:52:55 Read more

आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस

 आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 1) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र

ramdas tadas     एक तेल्याचे पोर, एक शेतकर्‍याचे पोर, ते ही विदर्भातले, मध्यप्रदेशात तेंव्हा हा विदर्भ सी.पी.अ‍ॅण्ड बेरर म्हणुन समजला गेलेला हा भाग. निसर्गाने झिडकारलेला, शासानाने तडीपार केलेला हा भाग. आचार्य विनोबा भावे, उद्योगपती बजाज, सेवाव्रती सुशील नायर सहकार महर्षी दादासाहेब देशमुख यांची कर्मभुमी या भुमीत 1 एप्रिल 1954 मध्ये खा. रामदासजी तडस यांचा जन्म झाला.

दिनांक 01-04-2016 10:35:09 Read more

खा. तडस साहेब म्हणजे दर्‍या खोर्‍यातील आवाज

प्रकाश  गिधे, म. तेली महासभा, खेड तालुका 

     ramdas tadas विशेषत: सह्याद्रिच्या दर्‍या, खोर्‍यात, उजाड माळावर वसलेल्या गावात तेली समाज मुठभर वस्ती. या वस्तीतला तेली पाटला समोर हात बांधुन उभा. गावचा सरपंच दोन शब्द बोलतो ही सुद्धा वार्‍याची झुळूक आहे. असा अनुभवणारा समाज. आमदार किंवा खासदारांना मते देयची आसतात. त्यांची साधी भेट ही घेता येत नाही. राखीव जागेवरील पद बोगस मराठा कुणब्यांनी पळवले आहे. आशा खचलेल्या, पिचलेल्या, कोंडीत पकडलेल्या तेली बांधवांना खासदार तडस साहेबांच्या रूपाने एक संजीवनी मिळाली आहे. कारण आहेरे समजल्या जणार्‍या जातीतच आमदार, खासदार असतात ही आमची रोजच्या जगण्यातील वास्तवता त्यांनी संपवली आहे. लोकसंख्येने 12 टक्के असलेला हा समाज ही सत्तेचा शिल्पकार होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.

दिनांक 31-03-2016 23:01:45 Read more

खा. रामदासजी तडस साहेबांचे पाय याच काळ्या मातीतुन चालतात.

श्री. पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र, म. तेली महा सभा.

     Teli samaj maharashtra ramdas tadas घार आकाशात उंच उंच झेप घेते. परंतू त्या घारेची नजर आपल्या घरट्याकडे आसते. त्या घारीची नजर त्या घरट्यातील आपल्या पिल्लाकडे आसते. त्यावर होणारा अन्याय, त्यावर येणारी संकटे ती येतात का पहाते. आसे जेंव्हा दिसते तेंव्हा ते उंच आकाशी गेलेली असतानाही काही क्षणात घरट्याकडे येते. आपले घरटे शाबुत करते, या साठी तडस साहेबांकडे पहावे लागेल ते प्रथम मार्केट कमीटीचे संचालक झाले. त्या नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष दोन वेळा आमदार अता खासदार झाले. ते आकाशात उंच उंच गेले परंतु आपली नजर आपल्या समाजाकडे देवून. हा समाज आहे म्हणुन ही सर्व झेप आहे. या समाजावर होणारे अन्याय या समाजावर येणारी संकटे ती दुर करणे माझे कर्तव्य आहे हे माणनारे. 

दिनांक 31-03-2016 22:44:00 Read more

खा. तडस साहेबांच्या कडून तेली समाज निष्ठा शिकावी

ramdas tadas समाजा विषयी तळमळ, त्याग व प्रेम आपण ठेवले तर समाज ही आपल्याला साथ सोबत देतो. आपल्या कामावर निष्ठा. सर्वांची मते जाणुण सर्वांना सोईस्कर निर्णय घेणे ही त्यांच्या कामाची पद्धत अनेकांची घडन करण्यास उपयुक्त ठरली आहे. मी एक तसा तैलिक समाज महासभेचा कार्यकर्ता. संघटनेने जबाबदारी दिली म्हणुन काम करू लागलो समाजाच्या कामा निमित्त त्यांना मंत्रालयात भेटण्यास प्रसंग आले. या वेळी संघटनेचा पदाधीकारी पेक्षा माझा समाज बांधव ही त्यांनी दिलेली वागणूक विसरता येत नाही. आलेला बांधव जेवला का ? नसेल तर जेवन करावयास चला ही त्यांची आपुलकी बरेच काही सांगुन जाते. मी तुमचा आहे. तुमच्यातील एक आहे. फक्त त्या मतदार संघातील आपल्या बांधवांनी मला समाज बांधव म्हणुन भरघेस मतदान केले हणुन मी खासदार झालो. ही त्यांची नम्रता पावलो पावली दिसते. ही जाणीव आजच्या बदलत्या जमान्यात सहज सापडत नाही. याहीपुढे जाऊन त्यांनी पुढचा पल्ला गाठला. खरे तर आम्ही त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास गेलो होतो. परंतु त्यांनी महाराष्ट्र मंत्री मंडळातील उपस्थीत असलेल्या काही मंत्र्यांची आमची ओळख करून ही दिली. यतुन माझा समाज बांधव कामा निमित्त आला तर त्यांना सहकार्य करा हा ही सल्ला दिला.

दिनांक 31-03-2016 22:08:14 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in