Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

दौडत निघाले ते संताजी विर.

 पुन्हा पालखी पांडुरंगाच्या देवळातून गावाबाहेर निघाली. फाट्यापर्यंत अभंगाचा गजर करीत गावकरी आले. या फाट्यावर निरोप दिल्यावर बाकी उरले पाच सहा लोक. ही मोजकी पण निवडक त्यागाची, जिद्दीची निष्ठेची माणसे उरली. जाणारी येणारी विचारीत जरा थांबत एवढीच माणसे म्हणुन चालू लागत. पण ही माणसे खचली नाहीत. दमली नाहीत. हरली नाहीत की पुन्हा परतली नाहीत. वरून पडणारा पाऊस अंगावर घेत चाकण जवळ करीत होती.

दिनांक 14-07-2015 21:00:53 Read more

दिंडी प्रमुखान कडुन संताजी पालखीसाठी मार्गदर्शन

santaji maharaj abhang

    माऊलीच्या मुक्काम ज्या ज्या तळावर असेल तेव्हा ते वेळ काढून अनेक दिंड्यात जाऊन त्यांच्या प्रमुखांना भेटत ज्यांचा उल्लेख करावा अशा दिंड्या ह्या की, चांगा वटेश्वर, सोपान काका महाराज, चौरंगी महाराज या व इतर पालख्यांच्या नेते मंडळींनी मार्गदर्शन केले.

दिनांक 13-07-2015 20:20:24 Read more

पाऊले चालती पंढरीची वाट

श्री. दिलीप फलटणकर

        सर्व धर्मातील, पंथातील, जातीतील अठरा पगड लोक वारीत सहभागी होतात. सामाजिक समतेच आणि एकात्मतेच दुसरं उदाहरण नाही. तिथं कोणी लहान नसतो, मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, तो असतो फक्त वारकरी. तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेला असतो. म्हणून पंढरपुरचा पांडुरंग हा खर्‍या अर्थानं प्रत्येकाला आपला वाटतो. सात, आठलाख लोक एकत्र येऊन श्रद्धेनं, भक्तीनं, एखाद्या देवासाठी जात आहेत. अशी ही जगाच्या पाठीवर एकमेव घटना असावी.

दिनांक 11-07-2015 22:00:44 Read more

मा. खा. रामदास तडस पहिले सर्वांचे मित्र नंतर खासदार

narendra modi & ramdas tadas    - पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र

परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर  पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.

दिनांक 28-03-2015 03:49:48 Read more

तेली समाजाचे शिल्पकार खा. रामदासजी तडस.

  श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र तेली महासभा

Teli samaj maharashtra ramdas tadas

  मा. केशारकाकु क्षिरसागर पुण्यात येत तेंव्हा त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्न सोडवत होतो. समाजा बरोबरचे प्रश्न यांचा मागोवा घेत होतो. मा. जयदत्त क्षिरसागर मा. रामदासजी तडस यांच्या बरोबर मुंबई व इतर ठिकाणी भेटी होत तेंव्हा तेली ताकद व तेली प्रश्न समोर येत आशा वेळी समाजाचा एक न भुतो आसा मेळावा निश्‍चित झाला. मेळाव्याचे ठिकाण सुदुंबरे हे ठरले अतिरेकी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून संत तुकारामांच्या विरोधातील कायदे पायदळी तुडवणारे महान संत संताजी यांच्या समाधी स्थळी सुदूंबरे हे जसे समाधी स्थळ आहे तसेच नजीकच्या देहू याच देहूत संत संताजींनी धन दांडग्या व जात दांडग्यांना तेली ताकद दाखवली. सुदुंबरे येथे महामेळावा निश्‍चित झाल्या नंतर केशरकांकुचे आशिर्वाद जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन व तडस साहेबांचे नियोजन हे आम्हा पुणे शहर ग्रामिण बांधवांना आयोजक म्हणुन उपयोगी पडले.

दिनांक 28-03-2015 03:33:36 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in