अहमदनगर शहर व जिल्हा तेली समाज संताजी विचार मंच अहमदनगर व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑफिस : संताजी विचार मंच C/o.श्री अरविंद त्र्यंबक दारुणकर, स्वामीकृपा, २६०३, तेलीखुंट, अहमदनगर.
भव्य वधु-वर पुस्तक प्रकाशन, अहमदनगर -२०२०
पुस्तिकाचे 'सोयरीक २०२०' असे नामकरण करण्यात आले आहे. ‘सोयरीक २०२०' च्या प्रचारासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करीत असून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परिचय फॉर्मचे वितरण करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याचे ठराविक ठिकाणी फॉर्म जमा करण्याचे केंद्र ठरले असून त्या ठिकाणीच फॉर्म भरून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
चंद्रपूर :- अखिल भारतीय तेली समाज संघटना प्रणित वधूवर सूचक मंडळ चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष पदी बल्लारपूर येथील प्राध्यापिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. विना संजय झाडे यांची नियुक्ती अखिल भारतीय तेली समाज संघटन व वर वधू सूचक मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय दिलीपजी चव्हाण, मुख्य सचिव सचिनजी देशमाने व अन्य पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
हिंगोली, ता. १३ : सेनगाव शहरातील तेली समाजातील एका व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याठिकाणी अंत्यविधीला विरोध म्हणून जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी दिली असून याबाबत रविवारी (ता.१३) एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव शहराजवळ तेली समाजाची स्मशानभूमी आहे.
मेहकर : संताजी कॉन्व्हेंटमध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा घाटावरील कार्यकारिणी व महिला घाटावरील कार्यकारिणों गठीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे व महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे यांनी मार्गदर्शन केले.