दि.०८/१२/२०२० रोजी उत्तर नागपूर बाळाभाऊपेठ स्थित संताजी महाराज मठ येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवक आघाडी विदर्भ कोषाध्यक्ष श्री.प्रविणभाऊ बावनकुळे यांचा अध्यक्षतेखाली संताजी महाराजांचा प्रतिमेला हार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले..!
श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने श्री क्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी जगनाडे महाराज समाधीस अभिषेक आणि महापूजा, सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. यावेळी यावर्षीचा पुण्यतिथी उत्सवाचे अध्यक्ष जयंत राऊत आणि उद्घाटक सिद्धेश रत्नपारखी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे आराद्य दैवत राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आज सकाळी ११ वाजता प्रतिमेचे पुजन उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,उस्मानाबाद नगरी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले
नविन नाशिक तेली समाज संचलित श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगिणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज संतशिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती शासकीय नियमाने प्रतिमा पुजन, आरती, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा लिहून काढलेत. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या काळाविषयी बरेच मतप्रवाह आहेत.