देवगड तालुक्यातील जामसंडे वेळवाडी (मळई) येथील तेली समाज बांधवांचे जामसंडे - विजयदुर्ग सागरी महामार्गावर जामसंडेपासून सुमारे ४ किमी अंतरावर श्री मेळेकर देवस्थान आहे. जामसंडे गावच्या बारा रहाटीमध्ये पूर्वी तेली हा मानकरी होता.
देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी येथील श्री आप्पाजी वाडेकर यांनी बांधलेले हे हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो.
श्री. बाळकृष्ण दाजी किंजवडेकऱ्यांचे किंजवडे - लिंगडाळ मार्गावर गणेशमंदिर भाविकांच्या भक्तिभावाला 'नवतेज' देते.
कुडाळ तालुक्यातील आकेरी गावात होळीपूर्वी दोन दिवस धालोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. या गावात तेलीवाडीने 'धालो' हि परंपरागत उत्सवाची जपणूक केली आहे.
गावरहाटीतील प्रथम देवस्थान श्री देव मेळेकर सदर देवस्थान जामसंडे वेळवाडी येथील तेली भाऊबंद यांचेकडे संपूर्ण हक्क आणि मान असलेले देवस्थान आहे. या देवस्थानची पूजा अर्चा तेली बांधव करीत आहेत.