औरंगाबाद - संताजी जगनाडे महाराज यांना संत तुकाराम महाराज यांचा सहवास वयाच्या दहाव्या वर्षांपासून लाभला. संताजी महाराजांनी व तुकाराम महाराजांनी आपल्या प्रबोधनातून लोकांना जागृत करण्याचे काम केले. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतरही ती पुन्हा लिहून समाजासमोर शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, असे प्रतिपादन सोमनाथ सुरडकर यांनी केले.
औरंगाबाद तेली समाज - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थान गणपती ते शनीचौक दरम्यान रविवारी (दि.८) वाहन रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. मच्छली खडक, गुलमंडीमार्गे टिळकपथ, पैठणगेट, क्रांती चौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी, त्रिमूर्ती चौकमार्गे गजानन मंदिर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, संताजी चौक तेथून सिडको बसस्टॅण्डमार्गे चिकलठाणा येथील गणेश मंदिर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
नाशिक तेली समाज : संताजी महाराज जगनाडे यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सरकारने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबतचे परिपत्रक काढल्यानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने याबाबत सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून आले. यानिमित्ताने प्रतिमापूजन, मिरवणुकांसह विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
मालेगाव : महानगर तेली समाज व श्री संताजी महाराज उत्सव समितीतर्फे अंबिका मंदिरात संताजी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणुकीनंतर प्रमुख पाहुणे आमदार दादा भुसे यांच्या हस्ते आरती व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष सर्जेराव चौधरी, संस्थापक माणिक चौधरी, उपाध्यक्ष बंडू चौधरी, कोषाध्यक्ष शिवाजी चौधरी, सचिव विशाल चौधरी, मालेगाव महानगर तेलिक महासभा, संताजी ब्रिगेड संघटना
अंदरसूल नाशिक येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवारांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजेंद्र सोनवणे यांनी संत शिरोमणी जगनाडे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.