Sant Santaji Maharaj Jagnade वाई तेली समाज आयोजित श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा रविवार, दिनांक २९/१२/२०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी निमित्त खालील कार्यक्रम आयोजित केले आहे. १.मूर्तीपुजा १०.३० वा. २. विद्यार्थी गुणगौरव ११.०० वा. ३.श्री संताजी महाराज यांचे जीवन चरित्र (टीव्ही सिरिअल प्रक्षेपण) १२.०० वा. ४. मान्यवरांचे मनोगत १.०० वा. ५. महाप्रसाद १.३० वा. तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब उपस्थित रहावे आशी विनंती करण्यात आलेली आहे.
इंदोरी, ता. २६ : दरवर्षी श्रीक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे जोरदार नियोजन सुरू आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा समितीचे अध्यक्ष म्हणून इंदोरीचे उद्योजक जयंत सूर्यकांत राऊत यांची एकमताने निवड केली. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड केली.
औरंगाबाद - जगतगुरू तुकाराम महाराज यांचे गाथा लेखक व तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराज यांची पुण्यथिती समाजबांधवानी घरोघरी साजरी करावी. जेणेकरून एकोपा निर्माण होऊन आपलेपणेची भावना निर्माण होईल. न्यू जयश्री अँडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक राजेंद्र होळीवाले यांच्या ठाकरे नगर N-2 सिडको येथील निवास्थानी अभिवादन सभेचे आयोजन होते.
१९ जानेवारीला तेली समाज मेळावा गुणवंतांचा गौरव : सेवानिवृत्तांचा सत्कार
आरमोरी : संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने आरमोरी येथील मंगल कार्यालयात रविवार १९ जानेवारी २०२० ला तेली समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार होणार आहे. तसेच उपवर-वधूंचा परिचय होणार आहे. २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीमध्ये ७० टक्के व बारावीमध्ये ७५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या
पैठण दि 24 डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज तिळवण तेली समाज धर्मशाळा पैठण येथे संताजी महाराज मंदिरात संताजी महाराज पुण्यतिथी ऊत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पैठण तालुक्याचे आमदार संदीपान पा भुमरे याचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद चे सभापती श्री विलास बापु भुमरे व सदस्य कापसे पाटील व नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक भुषण कावसानकर, ईश्वर दगडे, नगर आबासेठ बरकसे,संस्थेचे अध्यक्ष विक्रमसेठ सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे, सचिव भगवान मिटकर