नेवासा तेली समाज - धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तैलिक समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. अत्याचार करणार्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने सोमवारी दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय वडगाव,ता.मावळ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.
आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने सोमवारी दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय घोडेगाव,ता.आंबेगाव ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.
जालना : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणारया संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले. सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून या मोर्चास सुरुवात झाली.
अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील होंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणाच्या शिक्षकास कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी नगर शहरात सोमवार दि. २६ रोजी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक हरिभाऊ डोळसे यांनी दिली.