Sant Santaji Maharaj Jagnade
हुबळी :- कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध तेल निर्माते व विक्रिते कै. अनंतराव विष्णूपंत फलटणकर यांच्या पत्नी होत. त्यांचे वयोमाना नुसार दु:खद निधन झाले. त्या सायगांव, जि. सातारा येथील देशमाने घराण्यातील माहेरवाशीण होत्या. त्यांना फलटणकर (चिंचकर) देशमाने, बरडकर, पवार, राऊत व शेडगे परिवारा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
रमेश भोज हे तिळवण तेली समाज पुणे येथील विश्वस्त असुन महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा पुणे विभागाचे कार्याध्यक्ष ही आहेत त्याच बरोबर ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्ह्याचे ते अध्यक्षही आहेत. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड च्या माध्यमातुन वधु-वर मेळावे मुलांचा गुणगौरव, मोफत आरोग्य शिबीर, जेष्ठ समाज बांधवांचखा सत्कार अशा आनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना ह्या पुरस्काराने सणमानित करण्यात आले. त्याच बरोबर सौ. राधिका मखामले, यांचेही स्थान समाजात तेवढेच तोलामोलाचे आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा व ओबीसी महासभा पुणे जिल्ह्याच्या त्या महिला अध्यक्षा आहेत.
उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी लग्नानंतर तब्बल चौदा वर्षांनी दांपत्याने बारावाची परीक्षा दिली. विशेष म्हणजे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या मुलांनी पेढा भरवून मम्मी पप्पांचे कैतुक केले.
वाई : - सातारा सैनिक सहकारी बँकेचे शाखा मॅनेजर श्री. शरद दत्तात्रय किर्वे यांची ही मुलगी एस.एस.सी. परिक्षेत द्रविड हायस्कुल वाई या प्रशालेतुन ९८ मार्कांनी वाई शहर व तालुक्यात प्रथम आली आहे. तिचे अभिनंदन किर्वे, दळवी व देशमाने परिवारा तर्फे केले गेले आहे.
माणिकनगर नांदेड येथील रहिवाशी सौ. दिप्ती गजानन देशमुख यांना महाराजा सयाजीराव युनीलव्हरसीटी ऑफ बडोदा (गुजरात) वडोदरा च्या ६३ व्या दीक्षांत समारंभात फार्मसी विषयात कुलगुरू यांच्या हस्ते पीएचडी प्रदान करून गौरविण्यात आले.