जिल्ह्यातील सहा तालुके आणि मुळशी तालुक्यातील कासारसई गांवातील समाजबांधव कार्यकर्ते यांचे सहकार्याने कुटुंब परिचय पुस्तिका तयार झालेली आहे.समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. समाजबांधवांचे ऋण व्यक्त करुन यापुढेही समाजसेवेसाठीशनीमहाराजांची व संताजी महाराजांची क्रुपा लाभावी असे विचार मा. श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ पुणे जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविकातुन मांडले.
तेली समाज वधु -वर मेळावा वधु -वर फाॅर्म
mumbai teli samaj vadhu var melava from 2015
भव्यदिव्य मेळावा संपन्न करण्यास कमाल ७० लाख ते ७ लाख रूपये आज खर्च करावे लागतात. महाराष्ट्र भर साजरे होणारे जे मेळावे आहेत त्या सर्वांचा किमान खर्च हा १० ते १२ कोट रूपयांचा असावा. तो गोळा करण्यास लागणारी मानव शक्ती ही अफाट खर्च होत आसते. परंतु वधु -वर मेळावा ही संकल्पना समाज बांधवांनी न सांगता न ठरविता राबवली असेल तर ती श्री संत संताजींच्या समाधी स्थळी. सुदूंबरे येथे. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे ही संस्था मुळात समजाची मातृृसंस्था.
महाराष्ट्र तेली महासभेने विश्वास दिला म्हणुन उभा राहिलो पदाधिकारी नेमून त्यांना दिशा ही दिली. परंतु समाजात जाताना त्या बांधवांचे अनेक प्रश्न कारण या पुर्वी काहींनी त्यांना अनुभव चांगले दिलेच नव्हते. त्यामुळे ती त्यांची चुक नव्हती . तर त्यांचे सत्य मत बरोबर होते. या मंडळींना कृतीतुन विश्वास दिला. पुस्तक मुद्रित करण्यासाठी गोळा झालेला निधी ज्ञानराज पतसंस्थेत मुदत ठेवीत जमा केला.