वधु वर मेळावे काळाची गरज हा ही विचार अस्तीवात नव्हता तेंव्हा गणेश पेठेतील पांगुळ आळीतील शेलार वाड्यात कै. शंकरराव भाऊसाहेब कर्डीले रहात होते. तेव्हा पुण्याच्या प्रत्येक पेठेत समाज रहात होता प्रत्येकाच्या सुखात दु:खात समाज बांधव सामील होत होते बाहेरून आलेला समाज बांधव या प्रवाहात सामील होत आसे. कर्डीले तसे समाज विचाराचे आपले घर पाहुन ते ८२ भवानी पेठे येथे रोज जात. आजुबाजुच्या गावात ८२ पेठ मध्ये ही लग्न असेल तर हजेरी लावत. मग पत्रिका असो अगर नसो समाज लग्नातुन ते उपवर वधु वर शोधत.
त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.
सालाबाद प्रमाणे बारामती येथे पश्चिम महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा अंतर्गत विभागीय भव्य सामुदाईक विवाह सोहळ्याचे आयोजन २ जुन २०१५ रोजी करण्यात आल्याचे किरण मुंबईकर यांनी कोयनानगर कार्यकारीणी बैठकीत घोषणा केली. बारामती तालुक्यातुन सदर बैठकीस विभागीय अध्यक्ष पोपटराव गवळी तसेच जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजय किर्वे सह प्रविण पवार, विनय किर्वे, नितीन वाईकर, स्वप्नील दळवी, ज्ञानु दळवी सह इतर पदाधिकारी हजर होते.
श्री. क्षेत्र सुदुंबरे येथील मातृ संस्थेची गत महिण्यात कार्यकारणी मिटींग झाली. तेंव्हा एक भयान शोकांतीका समोर आली. शोकांतिका अशी श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे ही समाज संस्था शतक महोत्सव साजरी करण्यास काही वर्ष बाकी आहे. परंतु या मातृसंस्थे द्वारे श्री संत संताजी समाधी स्थळी मोठ्या प्रमाणात स्मृती दिन साजरा केला जातो. नेहमी प्रमाणो अध्यक्षांनी संस्था कार्यकारणी समोर फलगांव ता. हवेली जि. पुणे येथे वर्षभराचा हिशोब मांडला. खर्च सात लाखा पर्यंत. देणगी व इतर मार्गाने ४ लाख उत्पन्न आता जी काही कारणे आहेत.