फॉर्म पाठविण्या संबंधी सुचना :
1) मेळावा स्थळ : निलकमल लॉन्स मंगल कार्यालय, चांडोली नाक्याजवळ, पुणे-नाशिक हायवे. (राजगुरूनगर)
2) फॉर्म सोबत रु. 300/ - (रू. तिनशे फक्त) रोख / मनीऑर्डर / डी.डी. संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगुरूनगर यानावान पाठवावा कृपया चेक पाठवु नये.
3) फॉर्म सोबत 2 पासपोर्ट साईज रंगीत फोटो (अर्ध छातीपर्यंत) व त्यामागे स्वत:चे नांव व गावाचे नांव पेन्सिलने लिहुन त्यातील एका फोटो फॉर्मवर दिलेल्या जागी चिकटवावा व दुसरा फोटे प्लॉस्टिकच्या पिशवीत ठेवून स्टेपल करावा.
4) फॉर्म प्रत्यक्ष येऊन दिल्यास रोखीची पावती लगेच घ्यावी.
5) ज्यांच्याकडे हा फार्म असेल त्यांनी गरजूंना झेरॉक्स प्रत देऊन समाज कार्यात मदत करावी.
6) फॉर्म भरून झाल्यावर त्याची एक झेरॉक्स प्रत स्वत:कडे ठेवावी.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 5)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
चिंतन शिबीराचे फड अनेक ठिकाणी झाले. मिटींगां नेहमीच होतात. त्यात आढावा बैठकांची रेलचेल ही होत आहे. तेंव्हा वीस वर्षींचा एक प्रसंग सांगतो. राजुर, ता. अकोले येथील स्टँडवर मे महिण्यात उतरलो. स्टँडच्या आवारात तेली समाजातील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या दुकानात गेलो. त्यांनी जवळच असलेल्या ह.भ.प. कवाडे कडे पाठविले. ते वयोवृद्ध बांधव एकच वाक्य बोलले. अरे हा समाज लग्न व लाडू यातुन बाहेर पडु शकणार नाही. हे त्यांचे शब्द 20 वर्षांनंतर ही बाजुला जात नाहीत.
नांदेड, दिं. 13 :- तेली समाजाच्या युवकांनी पारंपारिक शिक्षणाचा त्याग करून कौशल्य शिक्षणावर भर द्यावा. येणार्या काळात तुम्ही कोणत्या जातीत जन्मला त्यावरून तुमचे भविष्य ठरणार नसून तुमच्यातील बुद्धी कौशल्य लेखणी व मनगटाच्या ताकदीवर तुम्ही उच्च पदस्थ होऊ शकता त्यामुळे ज्ञानावर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, असे उद्गार माजी मंत्री तथा अखिल भारतीय तैलीक महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी काढले.
तेली समाज सेवाभावी संस्था नांदेडने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याप्रसंगी उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ सूर्यवंशी होते. प्रारंभी तेली समाजाचे थोर संत जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री क्षीरसागर जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, दशरथ सूर्यंवशी उद्योजक जीएम जाधव मनोहरशेठ सिंनगारे यांच्या हास्ते करण्यात आले.
पिपलिया स्टेशन (निप्र)। घाणावार तेली समाज का 14 वां सामूहिक विवाह सम्मेलन 10 मार्च को भादवामाता में होगा। अध्यक्ष प्रकाशचन्द्र वाथरा (तुरकिया) उपाध्यक्ष घीसालाल खलकुंआ, सचिव सुनीलकुमार बिसलपुरा, कोषाध्यक्ष श्यामलाल अस्तोलिया ने बताया प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी सामूहिक विवाह होगा, प्रतिपक्ष से 11111 रुपए विवाह शुल्क रहेगा। वर-वधूओं को गृहस्थी बसाने के लिए समिति की ओर से अनेक सामग्री निःशुल्क दी जाएगी। पंजीयन अंतिम तिथि एक मार्च रहेगी। समिति पदाधिकारियों ने आगे बताया अभी तक 10 जोड़ों का पंजीयन हो चुका है, समिति का लक्ष्य 51 जोड़ों का है, विवाह सम्मेलन सफल बनाने के लिए समस्त समितियों का गठन किया जा चुका है। समाजजन फिजूलखर्ची से बचे व समाज में एकरुपता लाने के लिए विवाह योग्य युवक-युवतियों की शादी सामूहिक विवाह में करें।
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ रौप्य महोत्सवव देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्या सहकार्याने स्नेह व वधु - वर पालक परिचय मेळावा 8 मे 2016 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 भवानी मंगल कार्यालय तळेबाजार, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला.
मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी श्री. सदानंद तेली (अध्यक्ष देवगड तालुका तेली समाज ) हे होते. प्रमुख अतिथी मा. श्री. जनार्दन गोपाळ जगनाडे (अध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे ), श्री. सतिश वैरागी, जनार्दनशेठ तेली (माजी जि. प. उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा), श्री. रूपेश वायगणकर (नगररसेवक - मुंबई) या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.