Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे :- तेली समाज सेवक नाशिक येथील मासिकाचे जेष्ठ संपादक श्री. वसंतराव कर्डीले हे मंडल आयोग नेमल्या पासुन ओबीसी जागृती साठी झटत आहेत. १९८० पासुन त्यांनी या बाबत प्रखर लेखन केले आहे. या मुळे ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेचा सन २०१५ चा ओबीसी जाणीव पुरस्कार २-८-१५ रोजी मालेगाव येथे दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप फुले पगडी, स्मृती चिन्ह व शाल असेल. असे संघटने तर्फे सर्वश्री प्रदिप ढोबळे, मोहन देशमाने, दिंगबर लोहर, संदिप थोरात, प्रदिप कर्पे कळवितात.
![]()
ह. भ. प. कै. धोंडीबा राऊत, कै. दादा भगत, कै. शरद देशमाने, आश्रयदाते अर्जुनशेठ बरडकर या जाणत्या मंडळींनी पालखी सुरू केली. हे सर्वांना माहित आहेच परंतु या सुरूवातीच्या १ ले वर्षात जी धडपड झाली त्यावर पुढील प्रवास सुखकर झाला. यात राऊत बुवांची वणवण धडपड वृत्ती फार उपयोगी आली. दादा भगत हे एक जाणते होते. पुणे व पालखी मार्गावर नाते संबंध होते. त्या गोष्टीचा उपयोग त्यांनी इथे केला. त्यातून बरेच जन सहकार्यास समोर आले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
![]()
श्री. पोपटराव पालखी बरोबर पंढरीला जात. या वेळी अडानी पण खर्या सुशिक्षीत असलेल्या आईला एक गोष्ट पटत नव्हती. माझा संताजी ज्या पालखीतून मिरवत जातो. ती इतर संतांच्या पालखी सारखी दर्जेदर नाही. ही उनिव मुला समोर मांडली श्री. पोपटरावानी यावर स्वत: विचार केला. आणि संताजी साठी पालखी स्वखर्चाने बनवुन देतो असे सांगितले. रोख पैसे न देता अंदाजे एक लाख रूपयांची पालखी स्वत: बनवुन दिली. आईची इच्छा पूर्ण केली.
![]()
पण लक्षात राहते श्रीमती धोत्रे यांचे भविष्याचे वेध घेणारे कार्य. सोहळ्यास लोटणार्या जनलसमुदायाचे जेवण बनविण्यास भांडीच नव्हती. ती जवळ जवळ सुरूवातीस देण्याचे काम यांनी केले. याचबरोबर पालखी सोहळ्याचा इतिहास हा असाच संपेल. हे महान कार्य करणारी जी जी माणसे होती. ती ती माणसे अंधारात राहू नयेत अशी इच्छा हा सोहळा सुरू झाल्यापासून होती. तो इतिहास जपला जावा यासाठी ४ ते ५ हजार खर्च करून हा इतिहास छापील केला.
मग सर्व एकत्र आले. पालखी सुरूवात करणे जेवढे कष्टाचे होते तेवढेच, नव्हे जास्तच, त्याचे सातत्य टिकविणे अवघड होते. या अवघडपणावर चर्चा झाली. कार्यातले दोष झिडकारून सोहळा निर्दोष करण्यावर विचारविनिमय झाला. प्रत्येक वर्षी पालखीला भरीव स्वरूप येऊ लागले. तेव्हा पालखीसोहळ्याची पहिली कार्यकारीणी तयार केली.