वधु - वर फॉर्म

राहुरी तालुका तेली समाज श्री. संत संताजी जगनाडे महाराज ३१५ वी पुण्यतिथीचा कार्यक्रम

07 January 2015 Other 0 views

             श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची ३१५ वी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुका - तेली समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी संताजी महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खा. प्रसादराव (बापूसाहेब) तनपुरे डॉ. सौ. उषाताई तनपुरे - नगराध्यक्षा राहुरी न. प. मा. अरूणसाहेब तनपुरे, सभापती राहुरी ता. कृषीउत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. बापुसाहेब तनपुरे Teli Mahasabha rahuri यांनी श्री. संत संताजी जगनाडे महाराज्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिली. श्री. संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा ही पाण्यावर तरंगली म्हणजे ती पुन्हा लिखान झाले. लोकांच्या तोंडीपाठ असलेले अभंग लिहण्याचे कार्य श्री. संत संताजी जगनाडे महाराजांनी केले आहे. लिहीण्याची कला ही त्यावेळचा तेलाचा व्यवसाय करून जोपासण्याचे कार्य जगनाडे महाराजांनी केले म्हणुन आज आपण सर्वांना तुकारामांची ४००० अभंगाची गाथा अभ्यासासाठी, ज्ञान साधना करण्यासाठी मिळाली म्हणजे जिवीत आहे.

             महाराष्ट्राची कुलदैवत श्री. तुळजाभवानीची पालखी राहुरी येथे तयार करण्यात येते. ही एकमेवे अशी पालखी आहे. या पालखीची प्रतिमा या दिनदर्शिकेत प्रसिद्ध केली आहे. ही तेली समाजाने सर्वासाठी केलेली पंरपरा, संस्कृती यांची जोपासना करणारी आहे. पालखीच्या मानकर्‍यांचा सत्कार राहुरी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात यतो. राहुरी नगरपरिषदे कडुन मी सामाजीक कार्यास सहकार्य करण्याचे सुचित करित असे उद्गार नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी काढले आहे.

             ज्याच्या गावात / देशात तेली ते गाव / देश भाग्यशाली आहे. असे आता म्हणण्याची वेळ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणुन दिली आहे. असे. उद्गार मा. डॉ. प्राचार्य भुषण वसंतराव कर्डीले - महासचिव प्रांतीक तैलिक महासभा यांनी काढले आहे.

             समाज हा नातेगोती जपण्यासाठी नसुन समाजविकास, अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या जोखंडातुन सामान्य माणसाची सोडवणुक करतो. त्याचा आर्थिक बचत करतो तो खरा समाज पोट जातीच्या भिंती तोडून नव जागृती करतो तो समजा या मार्गाने जाऊन घडवण्याचे कार्य आपणा सार्वांना करावयाचे आहे. असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गजानन शेलार (नाना) कोषाध्यक्ष - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांनी केले आहे.

             समाज हा नातेगोती जपण्यासाठी नसुन समाजविकास अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या जोखंडातून सामान्य माणसाची सोडवणुक करतो. त्याचा आर्थिक बचत करतो तो खरा समाज. पोट जातीच्या भिंती तोडून नव जागृती करतो तो समजा या मार्गाने जाऊन घडवण्याचे कार्य आपणा सर्वाना करावयाचे आहे. असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गजानन शेलार (नाना) कोशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांनी केले आहे.

             या कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेचे जिल्हासचिव सदाशिव पवार (सर) राहुरी तालुका तेली समाज महासभा अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे जिल्हाकार्याध्यक्ष डॉ. प्रा. सुधाकर चौधरी, राहुरी शहर तेली समाज अध्यक्ष संजय पन्हाळे, खजिनदार रावसाहेब शेजुळ, ह.भ.प. गोकुळ अप्पा, ह.भ.प. नामदेव महाराज शेजुळ , ओबीसी सेल अध्यक्ष संदिप सोनवणे दत्तात्रय क्षिरसागर तालुका कार्यकारीणी व शहर कार्यकारीणी तेली समाज यांनी केले होते.

             सुत्रसंचालन :- अॅड. तात्यासाहेब डोळसे यांनी केले. सर्वांचे स्वागत व आभार सदाशिव पवार (सर) यांनी मानले आहेत.

राहुरी तालुका तेली समाज महासभेच्या कार्यक्रमास उपस्थिती

              मा. चंद्रकांतजी व्हावळ, अध्यक्ष पुणे जिल्हा तेली समाज महासभा (ग्रामीण) मा. हरिभाऊ डोळसे, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा मा. संभाजी जाधव - उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा मा. विजय काळे - अध्यक्ष - अहमदनगर शहर तेली समाज महासभा मा. वसंतराव कर्डीले - संपादक - समाजसेवक मासिक, नाशिक मा. छगन मुळे - संपादक - स्नेहजन तेली समाज मासिक बीड मा. भागवत लुटे - अध्यक्ष - रहाता तालुका तेली समाज महासभा मा. भरत साळुंके, अध्यक्ष श्रीरामपुर तालुका तेली समाज महासभा मा. रमेश दिवटे - अध्यक्ष - संगमनेर तालुका तेली समाज महासभा मा. रमेश गवळी - अध्यक्ष - कोपरगाव तालुका तेली समाज महासभा मा. बाळासाहेब गायकवाड - अध्यक्ष - कोपरगाव तालुका तेली समाज महासभा मा. ह.भ. प. रामदास महाराज क्षिरसागर केडगाव

जिल्हा, तालुका, गाव तेली समाजाचे प्रतिनिधी महिला आघाडीच्या अध्यक्षा :- सौ. संजना लोखंडे, कार्याध्यक्ष सौ. प्रमिला घोडके आदी उपस्थित हाते.
राहुरी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. वाय. एस. तनपुरे, प्रकाश जगधने, रावसाहेब तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History