वधु - वर फॉर्म

आता आपली जात कोणती ?

03 September 2017 Teli Samaj Pune 95 views

आता आपली जात कोणती ? ( भाग 1 )

    महाराष्ट्राच्या पोटजाती विसरण्याची सुखात मी केली. मीच सगळा तेली समाज एका झेंड्या खाली आणला ही मोठे पणाची कमान मी लावली. पण पोटजाती विसरा एकजुट करा म्हणता म्हणता एक घोडचुक झाली. समोर समाज बांधव दिसले. त्यांच्या चेहर्‍यावरचा भाबडा विश्वास दिसला. खिाशात पैसा आहे, मिरवाईची हौस आहे. पद पाहिजे व त्यावर प्रतिष्ठा मिळते हे पद मिळवण्यासाठी कटपुतली सारखे जे उड्या मारतात. अशी फौज स्टेजवर किंवा पहिल्या रांगेत आसते. हौसे, गवसे, नवसे आलेत. आपल्या नजरेच्या टापूत राहून भांड म्हंटले की भांडणारे आलेत. पाठाणीवर मारले तरी ब्र न काढता हुकूम म्हणजे सर्वस्व असे वागणारे  आलेत. असा सर्व मेळा गोळा झाला होता. तो असला मेळावा दिसताच अंगात वारे शिरल्या सारखे त्यांनी पोटजातीचे बोळवण करून केळवण ही केले. प्रचंड टाळ्या बरे भाड्याने घेतलेला हॉल सिमेंट कांक्रीटचा होता नाही तर छत पडून जी घटना घडली आसती त्यावर मिडीयाला दोन तिन दिवस रवथ करावयास संधी मिळाली आसती. तर पोटशाखा विसरून आपन तेली एक होऊ म्हणुन अभियान राबवणार्‍यांची ही झलक. पण या झलक बाज बांधवांना ही मागे टाकणारी एक घटना उत्तर प्रदेशात या महिण्यात घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंधूंनी सांगीतले आता पोटजाती विसरा व प्रत्येकाने दाखल्यावर मोदी  तेली लिहा.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं