वधू - वर फॉर्म

चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी दिनदर्शिका प्रकाशन आणि स्नेहमेळावा

17 January 2018 Teli samaj 108 views

        चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी दिनदर्शिका प्रकाशन आणि स्नेहमेळावा वार सोमवार ता. 15/1/2018 रोजी  मा. श्री. सतिशशेठ भालचंद्र वैरागी साहेब (अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा कोकण विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कोकण विभागाचे कार्याध्यक्ष श्री. गणेश मुरलिधर धोत्रे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मा. श्री. रघुवीरजी शेलार साहेब,जिल्हा सचिव मा. श्री. दिपकजी राऊत साहेब जिल्हा महिला अध्यक्ष कल्पनाताई लांजेकर मँडम, कोकण स्नेही मासिकाचे संपादक मा. श्री. सुरेशजी पडवळकर साहेब, संगमेश्वर तालुका अध्यक्ष मा. श्री. संतोषशेठ पावसकर साहेब, चिपळूण तालुका अध्यक्ष मा.श्री. प्रकाशशेठ (दादा) रहाटे साहेब, महिला अध्यक्ष मा.सौ. अरुणा इगंवले मँडम, श्रेष्ठ लेखक मा.श्री. अरुणजी इगंवले साहेब उद्योगपती मा.श्री. सुभाषशेठ रहाटे साहेब, तसेच जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.विनोदजी झगडे साहेब यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बाधंव उपस्थित होते. ह्या कार्यक्रम दरम्यान जेष्ठ व श्रेष्ठ समाज बांधवाचा व जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar