वधु - वर फॉर्म

तेली समाज भुषण पुरस्कार रमेश गवळींना

19 January 2015 Other 71 views

             लोणंद, ता. २९ : भोर येथील श्री संताजी महाराज तेली समाजाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा समाज भुषण पुरस्कार यंदा लोणंद येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश गवळी (अण्णा ) यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

             भोर येथील श्री संताजी महाराज तेली समाजच्या वतीने तेली समाजासाठी नि:स्पृह वृत्तीने योगदान देणार्‍या समाज बांधवास दरवर्षीहा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार श्री. गवळी यांना श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत आणि सेवानिवृत्त उपायुक्त जगन्नाथ पवार यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून तो प्रदान केला गेला.

             या वेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी शिनगारे, सचिव सुरेश देशमाने व सर्व सदस्य तसेच विवध मान्यवर उपस्थित होते. याबद्दल श्री. गवळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत