वधू - वर फॉर्म

संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम ठाणगाव सिन्नर तेली समाज

19 December 2017 sant santaji maharaj jagnade 93 views

       नाशिक - ठाणगाव सिन्नर तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील ठाणगाव इथे संताजी मित्रमंडळाच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 129  वी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली

        येथील मारुती मंदिरात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सूचनेचे युवानेते उदय  सागळे जि प सदस्य वनिता शिंदे रामनाथ  पावसे नामदेव शिंदे उपसरपंच शेखर कर्डिले सुधाकर कवडे अरुण केदार  आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते. संताजी महाराज जगनाडे यांच्या  मूर्तीचे पूजन करून सजवलेल्या रथातून कामरावणी या आदिवासी नृत्य लेझीम पथक  मिरवणुकीत सादर करण्यात आली. मिरवणुकीत आदिवासी महिलांच्या पथकाने उपस्थितांची मने जिंकली.

        यावेळी उदयसागर आणि काळे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार वाजी यांनी सांगितले की वारकरी संप्रदायातील अभंग काव्यरचनेचे काम संताजी जगनाडे यांनी केले. ठाणगाव करांनी आज पुण्यतिथी त्यानिमित्त भव्य स्वरूपात आदिवासी मिरवणूक काढून तालुक्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे असे सांगितले.  करण्यात आली यावेळी आमदार राजे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ए  ती शिंदे यांनी आभार मानले  ए. बी  कचरे  यांनी सूत्रसंचालन केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya