Bride / Groom Form

चांदवड तेली समाजा तर्फे बुधवारी संताजी संकुलाचे लोकार्पण

04 September 2017 Teli samaj 98 views

    उर्जामंत्री बावनकुळे उपस्थित रहाणार
    चांदवड :- शहरातील तेली समाज ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या संताजी संकुलाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. 13) सायंकाळी 7 वाजता होणार आहे. राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून, यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
    यावेळी तेली समाजाच्या वतीने येथील जनता विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सत्कार होळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्य तेली महासभेचे अध्यक्ष तथा खासदार रामदासजी तडस, दिंडोरीचे खासदार  हरिश्चंद्र चव्हाण, चांदवड - देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर, अंमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, गजानन शेलार, नाशिक जिल्हा परिषदेचे गटनेते आत्माराम कुभार्डे, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण काससलीवाल, मर्चंट बँकेचे चेअरमन तथा चांदपड नगर परषदेचे गटनेते जगन्नाथ राऊत उपस्थित रहणार आहेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran