वधु - वर फॉर्म

वर्धा तेली समाज वर - वधु नोंदणी अर्ज

17 December 2017 teli samaj vadhu var melava 0 views

संताजी जनसेवा मंडळ, हिंगणघाट

जिल्हा वर्धा तेली समाज वर - वधु नोंदणी अर्ज

    तेली समाजातील सगळ्या शाखेतील समाज बंधु व भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, संताजी जनसेवा मंडळ, हिंगणघाट, द्वारे हिंगणघाट येथे दर एक वर्षाच्या अंतराने तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा घेण्यात येत आहे.
    
    दरवेळी समाज बंधु व भगिनींकडुन या मेळाव्याला आपल्या आशिर्वादाने प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे.
    
    याच अनुषंगाने यावर्षी सुद्धा संताजी जनसेवा मंडळ, हिंगणघाट तर्फे हिंगणघाट येि तेली समाज वधु-वर पालक मेळावा घेण्यात येत असुन या मेळाव्याच्या निमित्ताने तेली समाजातील सगळ्याच शाखेतील उपवर-वधु च्या परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यावर्षीही आपल्याकडून मागील वेळेप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो.
    
    या पुस्तिकेत उपवर - वधुंचा परीचय प्रसिद्ध करण्यासाठी इच्छुकांनी आपल्या फाटोसह मंडळाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला नोंदणी अर्ज भरून दि. 10 जानेवारी 2018 पर्यंत खालील व्यक्तींशी संपर्क करून सादर करावा ही नम्र विनंती.

कार्यक्रमाचे ठिकाण व दिनांक व वेळ काही दिवसातच प्रसिद्ध करण्यात येईल.

Wardha teli samaj vadhu var form Wardha teli samaj vadhu var form 2017

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा