वधू - वर फॉर्म

तेल्याना तेल काढायला विधी मंडळात जायचे का कुणब्याना नांगर धरायला ? हे म्हणणारे टिळक तेल्यातांबोळ्याचे पुढारी कसे ?

20 January 2015 Teli samaj 34 views

             पुणे - टिळक कट्टर ब्राह्मण्यवादी होते. ते समतावादी नव्हते. याचे जीवंत उदाहरण म्हणजे त्यांनी अथनी येथील जाहिर सभेत सांगतीले तेल्याना तेल काढायला विधी मंडळात जायचे का कुणब्याना नांगर धरायला ? याच दरम्यान राजर्षी शाहु यांनी उपेक्षीता साठी आरक्षण प्रणाली राबवली. त्याच शाहू महाराजा विरुद्ध टिळकानी संघर्ष केला. त्याच्या पुर्ण जीवन चरित्रात त्यांनी कुठेच तेल्या साठी काही केले असा उल्लेख नाही.

             तरी तेल्या तांबोळ्यांचे पुढारी लेबल लावुन ब्राम्हण प्रणाली जेंव्हा सांगते तेंव्हा या मागचा कुटील डाव समोर येतो. या उलट त्यांचे चिरंजीव समतावादी होते ते समतावादी होते म्हणुन बाळगंगाधर टिळकाच्या सहकारी मित्रांना कंटाळून चिरंजीवांना आत्महात्या करावी लागली असे टिळक आपले मित्र का शत्रु याचा विचार करावा. देशाचे पंतप्रधान भाजपाने दिलेले पंतप्रधान आहेत. त्यांना काही जन तेली समाजाचे म्हणतात पण ते जन्माने तेली आहेत हे जाहिर करीत नाहीत . त्यांनी ज्याक्षणी तेली किंवा इतर तत्सम जाती साठी केले तर ब्राह्मणी प्रणाली किती दिवस सत्तेत ठेवेल हा प्रश्न कदाचित त्यांच्या समोर असेल कारण ही ब्राह्मणी प्रणाली टिळका पासुन गतीशील झाली. टिळक म्हणत असत ब्राह्मणाचे डोके व मराठ्यांचेे मनगट जेंव्हा एक होईल तेंव्हा कायापालट होईल. म्हणजे ५२ टक्के ओबीसी त्यांच्या नजरेत कोण होते. असे स्पष्ट मत ओबीसी सेवा संघा तर्फे मोहन देशमाने, दिंगबर लोहार, रमेश भोज, संदीप थोरात प्रदिप कर्पे यांनी व्यक्त केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story