वधू - वर फॉर्म

अमरावती तिवसा शहरात तेली समाज मिलन मेळावा

05 December 2017 sant santaji maharaj jagnade 112 views

       अमरावती दि.26:11:2017 रोजी पहील्यांदाच,  अमरावती  तिवसा शहरात तेली समाज मिलन मेळावा आयोजीत केला होता. या कार्यक्रमासाठी तिवसा शहरातील संपूर्ण तेली बांधवांनी उपस्थिति दाखवुन संपुर्न कार्यकर्त्यांच मन जिंकले होते. या कार्यक्रमासाठी तेली सामाजातील दिग्गज लोकांनी उपस्थिति दाखवीली त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.

     या आयोजनात वरीष्ठ मंडळींचा पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले व अध्यक्षांच व प्रमुख पाहुने म्हनुन लाभलेले श्री प.पु.वैद्य महाराज व तेली समाजाचे नगरसेवक, नगरसेवीका, व समाजसेवीका यांचा सत्कार हार व शाल श्रीपळ देवुन करण्यात आला. या कार्यक्रमाला लाभलेले मा.पो.नि.सतीश जाधव साहेब तिवसा, यांनी आपली उपस्थिति दाखवुन सर्व तेली सामाज बांधव यांचा आनंद द्विगुणीत केला.

तिवसा तेली समाज बांधवां तर्फे या आयोजना उपस्थिति दाखविल्याबद्दल सर्व नागरीकांच स्वागत
शुभेच्छुक  समस्त तेली समाज बांधव तिवसा शहर

जय संताजी,जय संताजी,जय संताजी

Amravati Tivsa teli samaj Milan melava

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran