वधू - वर फॉर्म

संत संताजी जगनाडे स्मारकासाठी एक कोटी रूपये

17 December 2017 sant santaji maharaj jagnade 105 views

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

    नागपुर - संत जगनाडे महाराजांनी संत तुकारामांची संपूर्ण गाथा त्यांच्या तल्लखबुद्धीने स्मरण करून लिहून काढली. त्यांनी समाजाला दिलेली ही मोठीच देणगी आहे. अशा समाज संतांचे उत्कृष्ट स्मारक साकारण्यासाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    श्री संत संताजी जगनाडे पुण्यतिथी स्मरण सोहळ्यानिमित्त जगनाडे चौक येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, आमदार जोगेंद्र कवाडे, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बाबुलाल वंजारी, स्मारक समितीचे अध्यक्ष बन्सीलाल चौधरी आदी उपस्थित होते. 
    
    इतर मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासाठीच कायदा लोकसभेत ठेवला. लोकसभेत हा कायदा पारित झाला असुन राज्यसभेत पारित झाल्यावर इतर मागास वर्ग आयोगाला लवकरच घटनात्मक दर्जा प्राप्त होईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगीतले.

sant santaji maharaj jagnade smarak devendra fadnavis

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi