वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी साकुरी येथे उत्साहात संपन्न.

20 January 2015 Other 76 views

             साकुरी :- तालुका राहाता जि. अहमदनगर येथे श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त साकुरी येथे तेली समाज बांधवातर्फे सामुदायीक अभिषेक करण्यात आला. महापुजा करून गावातून सजवलेल्या रथातुन संताजी महाराजांच्या प्रतिमेची ढोलताश्यांच्या गजरात पुढे भजनी मंडळ सर्व भगिनींनी, मुलींनी भजन म्हणत, फुगड्या खेळत भक्तीमय वातावरणात आनंद लुटला यावेळी गावात पालखी रस्त्यात सर्वत्र रांगळ्या घालण्यात आल्या होत्या. व ठिकठिकाणी समाज बांधव श्री. संपतराव लुटे व श्री. कैलास लुटे या समाज बांधवांनी सामुदायीक आरती केली. व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी संताजी महाराज मंदिरासमोर धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी संताजी महाराज मंदिरासमोर धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. या कार्यक्रमाप्रसंगी समाजाचे राहाता तालुका अध्यक्ष श्री. भागवतशेठ लुटे, श्री. गोपीनाथशेठ लुटे, श्री. अशोक थोरात, श्री. अनिल लुटे, श्री. संपतराव लुटे, श्री. नंदकिशोर लुटे, श्री. गणेशशेठ कर्पे, श्री. जगन्नाथशेठ लुटे, श्री. बाबुराव महापुरे , श्री. सर्जेराव विंजकर, श्री. सोननाथ लुटे, श्री. गणेश सोनवणे, श्री. वसंत शिरसाठ, श्री. नवनाथ धामणे, श्री. अर्जुन मगर, श्री. पन्हाळे परिवार तसेच राहाता शहर अध्यक्ष श्री. विठ्ठलदास लुटे, व तालुका कोषाध्यक्ष श्री. शंकर हाडके व कार्याध्यक्ष श्री. बद्री लोखंडे, श्री. राजेश लुटे व इतर सर्व समाज बांधवांचे मोूलाचे सहकार्य लाभले.

शेवटी रहाता तालुका अध्यक्ष श्री. भागवत लुटे यांनी सर्व समाज बांधवांचे भजनी मंडळांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli ghana kohlu