वधु - वर फॉर्म

श्री संत संताजींचा वारसा जपणारा मावळ तालुका

28 January 2015 Other 1 views

DNYANESHWAR durgude              पुण्‍ो, मावळ - धर्ममार्तंड, जात दांडग व मातलेल्या सत्ताधीशांना संपविण्यासाठी संत तुकारामांनी येथे शब्दांची शस्त्रे हाती घेऊन या परिसरात सामाजीक लढाई सुरू केली. या लढाईचे सरसेनापती पद संत संताजींनी यशस्वीपणे पुर्ण केले त्यांची समाधी याच तांबड्या मातीत. संत तुकारामांना अभंग बुडविण्याची शिक्षा देऊन न थांबता बहिष्कृत करणारी धर्माची ठेकेदार मंडळी समोर आली तेंव्हा त्यांचा खोटा धर्म संघटनेच्या जोरावर त्यांनी पायदळी तुडवले होते. आशा संताजींनी तुकोबाचे अभंग सुदूंबरे येथे जपले होते. शेकडो वर्ष हे अभंग तळेगाव येथे जगनाडे कुटूंबीयांनी जीवा पाड जतन केले. हा या मातीचा अभिमानाचा वारसा आहे. संत संताजींनी याच मातीत समाधी घेतली. झाकून ठेवलेले दडपून टाकलेले सामाजीक कार्य व समाधी स्थळ प्रकाशात आल्यापासुन आजपर्यंत या मावळ्याच्या मंडळींनी समाधी साठी श्रमदान व योग दान दिले आहे. दुष्काळ प्रसंगी ठेवणीतीला तांदुळ देऊन प्रसंगी उपासमार सहन केली पण स्मृतीदिनात खंड पडू दिला नाही. ही समाजाची वाटचाल आहे. श्री. बाळासाहेब कोथूळकर श्री. किर्वे श्री. गणपतराव शेडगे या मंडळींनी संस्था पदाधीकारी व प्रक्रियेत सहभाग होऊन सुदंबरे संस्था गतीमान होण्यातमोठा सहभाग घेतला याच मातीतुन कामगार नेते श्री सहदेव मखामले हे मुळ कवी विचाराचे साहित्य व संस्कृतीचे आधार स्तंभ विविध साहित्य संमेलन भरवुन त्यांनी आपल्या सहित अनेकांना संधी देऊन उभे केले ही जाणीव श्री. मोहन देशमाने यांनी व्यक्त केले. एक समाज बांधव म्हणुन श्री. मखामले यांनी त्यांना १९७८ मध्ये प्रथम साहित्य संमेलनात विचारपीठावर उभे केले. हे मोहन देशमाने प्रांजळ पणे कबुल करतात.

             इथे राजकीय वारसा समाजाचा मोठा आहे. मावळ तालुक्यात जनसंघाची पाळेमुळे रोवणारे जे होते त्यात कै. बाळासाहेब बारमुख प्रमुख याच बारमुखांनी विधान सभेत पाच वर्ष हजेरी लावली मावळ तालुक्याच्या विकसाचे शिल्पकार ही ते झाले. श्री गणपतराव शेडगे हे मावळचे सभापती होते. तर साखर कारखाण्याचे संचालक ही आहेत. तळेगाव दाभाडे लोणावळा या नगरपालीकेत मखचामले, सौ. सुरेश खोंड, श्रीमती मिरा फल्ले या व इतर मंडळींनी ठसा उमटवला आहे. ग्रामिण भागात नाने निगडे या गवातील पाटील सरपंच पद कायम सामाजाकडे आहे. यातुनच एक समजुन येते आम्ही यशस्वी प्रशासन ही करू शकतो. इंदोरी या गावात श्रिमती सुनंदा राऊत यांनी सरपंच तर संभाळलेच सोबत गावप्रगती पथावर नेहले. गावच्या ग्रामपंचायतीत श्री. भागवत यांचा ठसा मोठा. कै. धोंडीबा राऊत यांनी आपली पत्नी आपली बहिण या सह १० बांधव घेऊन जी संताजी पालखी सुरू केली ती याच मातीतून व याच मातीतले होते.

             सामाजीक, राजकीय, धार्मीक, सांस्कृतीक क्षेत्रात तेली बांधवांचा ठसा हा न पुसता येणारा. तेली आळी ही तळेगावची विचार वाहीनी. याच ठिकाणी जुनी समजाची वास्तु व समाज संस्था समाज विचाराची जागा ती जुनी होताच पुन्हा बांधनी सुरू आहे. सर्वश्रीबाळासो कोतुळकर नंदू किर्वे कमलाकर क्षिरसागर आशा बर्‍याच मंडळींनी समाज संघटीत करून बैठका व सभा घेतल्या श्री. नंदु किर्वे यांच्या नेतृत्वा खाली एक वेळ वधु वर मेळावा ही यशस्वी पणे संपन्न झाला.

             आशा जागृत तालुक्याची जबाबदारी श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे श्री. किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे यांच्याकडे आली. श्री. दुर्गुडे यांनी तालुक्यातील परंपरेला साजेसे कार्य सुरू केले. सलग दोन वर्ष विद्यार्थी गुण गौरप समारंभ घेऊन संघटन जिव्हाळा निर्माण केला. या बळावर ते खाने समुरी करू लागले. डोंगराच्या कपारातील गर्द झाडीतील समाजाची घरे शोधणे त्यांचा विश्वास संपादन करणे. त्यांच्यात सुसंवाद साधुन संघटन करणे ही कसरत सुरू झाली. घराला जगवणारी थोडीशी शेती भांडवलाविणा सुरू केलला व्यवसाय, शिक्षण घेऊन वणवण भटकणारी तरूण मुंलांचा तांडा यांचे वास्तवी सत्य अस्वस्थ करीत होते. शेकडा १० ते १५ टक्के बर्‍या पैकी व्यवसाय व नोकरी करणारे गरिब व विधवा महिलांचे असे अनेक प्रश्न समोर आले. खाने सुमारी म्हणजे डोकी मोजणे ही प्रक्रिया राबवुन रखडले आहेत. त्यांच्या साठी काम करणे हे समजुन आले. या कठीण व त्रासदायक कामासाठी सर्वश्री ज्ञानेश्वर दुर्गुडे राजेश राऊत नंदू किरवे, अरूण काळे, विठ्ठल (अप्पा) करपे, किसनराव अवसरे, बळीराम धोत्रे, भरत दहितुले जयंत रा्ऊत, सनिल करडीले भिकाजी भागवत, प्रकाश वालझाडे, सत्यवान कोथुळकर, तुषार जगनाडे, शैलेश मखामले, संतोष रोकडे, गजानन भागवत, नाथुभाऊ भागवत, जिवय जगनाडे, संतोष पन्हाळे, संजय कसाबे, सुनिल शेडगे श्रीमती मीरा फल्ले, सौ. शालीनीताई झगडे या व इतर समाज बांधवांनी सहकार्य केले. यातुन समाज परिवर्तनास नवी दिशा मिळाली

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana