वधु - वर फॉर्म

श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे तेली समाज वार्षिक स्नेहसंमेलन २०१८

10 January 2018 Teli samaj 1 views

          श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे आयोजित तेली समाज वार्षिक स्नेहसंमेलन - २०१८ रविवार, दि. ४ फेब्रुवारी, २०१८ दुपारी ०४:३० ते ०७:०० वाजेपर्यंत सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी रोड, ठाणे (प) या ठिकाणी  आयोजित करण्‍यात आलेला आहे.  सदर स्‍नेह मेळाव्‍यात  विद्यार्थी-गुणवंत गुणगौरव समारंभ,  ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ,  महिला हळदी कुंकू समारंभ, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसे इत्‍यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍़यात आलेले आहेत. 

            गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाव-नोंदणीची अंतिम तारिख : २० जानेवारी, २०१८ राहिल. सांस्कृतिक कार्यक्रम नावनोंदणीसाठी संपर्क : श्री. रुचिकेत सावंत - ९९३०२७५२३३ गुणगौरव व ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभाकरिता संपर्क : श्री. राजेंद्र सावंत - ९३२२०८५३९९ सौ. मानसी महाडिक - ९०२९२७६३५९ सदर मेळाव्‍यात तेली समाज बांधवानी जास्‍तीत जास्‍त संख्‍येने उपस्थित  राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.   हि माहिती सुजित कुमार रसाळ  सचिव : श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे यांनी दिली. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar