वधू - वर फॉर्म

दोंडाईचातील दुष्कृत्याचा शिंदखेडा तेली समाजाकडून तिव्र निषेध

24 February 2018 Teli samaj 85 views

       शिंदखेडा, दि.१९ (प्रतिनिधी) - दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाच्या नराधमास व त्यास पाठीशी घालणाच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा मोर्चा काढून रास्तारोकोचा इशारा शिंदखेडा तेली समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

       घटनेच्या निषेधार्थ शिंदखेडा तेली समाजाच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. दि.८ रोजी ज्ञानोपासक संस्थेच्या नुतन विद्यालय दोंडाईचा येथील बालवाडीत शिक्षण घेणा-या अल्पवयीन मुलीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केला. याबाबत संबधीत संस्थेच्या सभासदांना सांगून देखील सदर आरोपीवर कारवाई झाली नाही. असे कृत्य करणा-या नराधमास व त्यास पाठीशी घालणाच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दि.२१ फेब्रुवारी २०१८ रोजी मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार पंकज मंडाले व ए.पी.आय.रमेश चव्हाण यांना देण्यात आले. याप्रसंगी तेली समाजाचे प्रकाश चौधरी, दिपक चौधरी, सुनिल चौधरी, डॉ.नितीन चौधरी, राजेंद्र चौधरी, किरण चौधरी, विनोद चौधरी, निंबा चौधरी, संतोष चौधरी,आत्माराम चौधरीसह तालुक्यातील तेली समाजाचे नागरिक उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand