वधू - वर फॉर्म

अल्‍पवयीन मुलीवरील अमानुष्‍ा अत्‍याचाराचा मुर्तिजापूर तेली समाजा कडून निषेध

25 February 2018 sant santaji maharaj jagnade 97 views

            मुर्तिजापूर तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा येथील संताजी सेना व तेली समाज मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तेथील नुतन महाविद्यालयात तेली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष  अत्याचार करून मानवतेला कळीमा फासणारी घटना दुर्दैवी घटना घडली. या बाबत तिव्र संताप व्यक्त करण्यात येवून संताजी सेना मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष सुमित सोनोने, प्रशांत गडवाले, योगेश आगशे, राहूल गुहाने, राजेंद्र कपीले, पंकज अंबाडेर, आशिष बोबडे, लोकेश लोखंडे, अमित सोनोने, निलेश सुखसोहळे, राहूल गुल्हाने, पुष्पक हांडे, कुणाल पळसोक्र, शुभम कनोजे, अजय चतूरकर, ज्ञानेश्वर गठवाले, ऐ.जे. गुल्हाने आदींच्या निवेदनावर स्वाक्षया आहेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu