Bride / Groom Form

रत्नागिरी तेली समाज उन्नती संघ  चिपळूण व गुहागर

09 February 2018 Teli samaj 115 views

     रत्नागिरी तेली समाज उन्नती संघ चिपळूण व गुहागर यांस तर्फे मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2018 रोजी महाशिवरात्रि स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर संमेलन हे विजय कृष्णाजी रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तर समान्य विशेष प्रमुख अतिथी श्रीमान शरद सुभाष तेली, उपनगराध्यक्ष बदलापूर असतील. सन्मानीय प्रमुख उपस्थिती श्री संजय बनाजी राउत, श्री गणेश मारुती महाडिक, महाराष्ट्र प्रांतिक सैनिक महासभा कोकण विभाग उपाध्यक्ष, श्री अतुल अनंत लांजेकर सरपंच झोम्बडी ग्रामपंचायत, श्री. सिताराम गणपत झगडे सल्लागार तेली समाज सेवा संस्थां चेंबूर, असतील. स्वागताध्यक्ष रवींद्र विठोबा चव्‍हाण, श्री. चंद्रकांत गण्‍ापत झगडे, सूत्रसंचालन अभिजित कमलाकर रहाटे, श्री वैभव विनायक महाडीक,

    विद्यार्थी गुणगौरव समारंभ तालुक्यातील दहावी, बारावी, पदविका पदवी पदव्युत्तर क्रीडा क्षेत्र तसेच विविध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण फक्त अशा मुला मुलींनी आपल्या गुणपत्रिका प्रमाणपत्रे नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक लिहून 31 जानेवारी 2018 पर्यंत संघाच्या कार्यालयात अथवा कार्यकारिणीकडे पोहोचत्या कराव्यात तसेच स्‍वतः उपस्थित राहून गौरवाचे मानकरी व्‍हावे अशी विनंती तेली समाज उन्नती संघ चिपळूण गुहागर यांनी समाज बांधवांस केली आहे.

     संमेलन कार्यक्रम श्री राजेंद्र सावंत यांचे गुरुदत्त सुगम भक्ती संगीत., मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागत समारंभ, शिवपिंडीचे पूजन, पाहुण्‍़याचे व संमेलनाध्‍़यक्षांचे मनोगत, हळदी कुंकू समारंभ, विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस समारंभ, अल्पोपहार. जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहून तेली समाजाच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती तेली समाज उन्नती संघ यांनी केली आहे.

Ratnagiri teli Samaj chiplun Guhagar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj