Bride / Groom Form

एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास

30 January 2018 Teli samaj 87 views

एक समर्थ संताजी विचार वंश कोकणात उदयास - भाग 1 - मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

    पिड्यान पिड्या वाट्यास आलेले नव्हे तर दिलेले शुद्राचे जीवन. सत्ता मुसलीमांची पण माजोरी झालेली धर्म सत्ता. ब्राम्हणपणा म्हणजे धर्म. देव आमच्या मुठीत. म्हणून तुम्ही आमच्या पावला खाली दडपून रहाणे ही दहशत म्हणजे धर्म शास्त्र. मंदिरातील देव यांच्या मुठीत होता. पण स्वत:च्या रक्षणासाठी हे ठेकेदार मुसलीम सत्तेचे वाटेकरी. एक वेळ मान्य करू. देवाचा धाक दाखवणारी ही मंडळी मुस्लीम सत्तेचे कर्ते सवरते सरदार होते. ही बाब सुद्धा मान्य करू पण. धर्माचा देवाचा धाक दाखवणारी ही मंडळी भारत भूमीत देव शास्त्र किती प्रभावी आहे हे सिद्ध करतात. पण या देशात आलेल्या मुसलीमांची संख्या याच धर्म वेडे पणास मुळात कारणीभुत आहे. बर्‍याच पूर्वी  झीडकरलेल्या शुद्राने धर्म बदलताच त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत रमणारे होते. हे ही समजून घेऊ. आपल्या मुली ह्या मुसलीम सरदारांना देऊन रक्ताची नाती निर्माण करणारे हे कोणते धर्मशास्त्र ? हा प्रश्न ही उभा रहातो. पण देव मुठीत ठेऊन वावरणार्‍या या मंडळींना देवाच्या विविध चमत्कारात ही सत्ता उध्वस्त करता का आली नाही ? स्वर्गीतील देवांना फक्त संत तुकारामांना स्वर्गात नेहण्यास वेळ होता. पण शेकडो वर्ष ही मुसलीम सत्ता उध्स्त करण्यास देवाला यांनी कुठे बांधुन ठेवले होते ? हा जो नेमका प्रश्न आहे. या सामाजीक व्यवस्थेची चिरफाड करणे म्हणजे सत्याची कास धरणे. सत्याच्या विचाराने उभे रहाणे. न्याय देण्यासाठी ही मंडळी देवाच्या नावावर अन्याय करतात. हे समाज व्यवस्था लुळी पांगळी करतात. ही लुळी पांगळी मंउळी. रोजचे जगने धार्मिक, शास्त्रीय पणाच्या वेदना सात काळजात जपून ठेवतात. त्यांना गोंजरणे, प्रेरणा देणे व आर्थिक, सामाजीक, राजकीय बाबत पिचला आहेस. या पिचलेल्या माणसाला खरा देव , खोटा देव हे समजून सांगणे व उभे करणे हा संत संताजींचा जीवनाचा गाभा. मी शुन्य जरूर आहे. पण जगण्याचा अधीकार तुमच्या एवढाच आहे. या केंद्रा भवती समाज एकत्र करणे हे संत संताजी कार्य. वशं हा दोन प्रकार असतो. एक रक्त वंश व दुसरा विचार वंश, विचार वंश हा त्या व्यक्तीच्या विचार  प्रक्रियेवर मनन चिंतन करून वाटचाल करीत असतो. याच साठी हे महापुरूष आदर्श आसतात. त्यांच्या जयंती, पुण्यतिथीचा जयजयकार यातच आपण कार्यातून जो विचार उभा केला तो वाढवणे व आदर्श ठेऊन वागणे तोच विचार वंश असतो.
 

sant_santaji_jagnade_maharaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध