Bride / Groom Form

अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचाराचा मूर्तीजापूर  तेली समाजा कडून निषेध

19 March 2018 Teli samaj 64 views

              मुर्तिजापूर : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा मूर्तीजापूर  तेली समाज  संताजी सेना मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तेथील नुतन महाविद्यालयात तेली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून मानवतेला काळीमा फासणारी घटना दुदैवी घटना घडली. या बाबत तिव्र संताप व्यक्त करण्यात येवून संताजी सेना मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष सुमित सोनोने, प्रशांत गडवाले, योगेश आगाशे, राहूल गुल्हाने, राजेंद्र कपीले, पंकज अंबाडेर, आशिष बोबडे, लोकेश लोखंडे, अमित सोनोने, निलेश सुखसोहळे, राहूल गुल्हाने, पुष्पक हांडे, कुणाल पळसोकर, शुभम कनोजे, अजय चतुरकर, ज्ञानेश्वर गवाले, ऐ.जे. गुल्हाने आदींच्या निवेदनावर स्वाक्षया आहेत.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh