वधु - वर फॉर्म

ओळख तेली गल्लीची

04 March 2015 Teli samaj 1 views

 श्री. रमेश सदाशिव भोज
 अध्यक्ष :- संताजी सेना पुणे, जिल्हा.

       समाजासाठी आपण काहितरी केले पाहिजे हि भावना मनात ठेवुन श्री. मोहन देशमाने हे गावकुस ते तंली गल्ली या मासिकातुन गेली कित्येक वर्षापसु समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. याचा अनुभव सर्व समाज बांधवांना आहेच समाज जिवनाचा अभ्यास, ओबीसी साठी चाललेली धडपड समाज संघटना समाज प्रबोधन समाजाच्या प्रगतीचा ध्यास हे सर्व तेली गल्ली मासिकाद्वारे आजपर्यंत करीत आलेले आहेत.

Ramesh  Bhoj

     अत्यंत हलाखिच्या परिस्थितीत खिशातील पैसे टाकून आपल्या पत्नीचे तीन वेळा दागिने गहाण ठेवुन हे तेली गल्ली मासिक चालू ठेवले. सध्या आपण पहातो कित्येक समाज मासिके आली आणि बंद पडली. पण काहींनी फक्त दोन पानीच अंक चालू ठेवला. परंतु मोहन देशमाने यांनी गावोगावी  फिरून या परिस्थितील  समोरे गेले आणि हा अंक अखंडीत पणे चालू ठेवला. गेल्या ३२ वर्षापासुन त्यांचे हे कार्य चालु आहे. आजपर्यंत समाजातील वधु - वरांची माहिती त्यांनी या मासिकामध्ये विनामुल्य झापलेली आहे. या सर्व कार्यात त्यांच्या पत्नीचाही सिंहाचा वाटा आहे. प्रथम गावुकस या मासिकाच्या माध्यमातुन १५ वर्षे समाज प्रबोधन केले. काही तांत्रीक  अडचणी मुळे गावकुस मासिक बंद करून त्यांनी तेली गल्ली  या नावाने नविन मासिक चालु केले. तेही आता  १६ वर्षापासुन सुस्थीतीत चालू आहे. असा ३१ वर्षाचा अखंडीत प्रवासा आजपर्यंत  त्यांनी  कार्यकारी संपादक  म्हणुन पार पाडलेला आहे. समाजातील विविध संधअनांची माहिती त्यांनी राबविलेले कार्यक्रम वधु-वर मेळावे, शुभेच्छा, वाढदिवस, निधनवार्ता, गौरव समारंभ सर्व प्रकारच्या उद्योगाच्या जाहिराती पुरस्कार अनेक प्रकारचे शिबीरे, मुलांचा गणुगौरव समाजबांधवांना मिळालेली  पदे, शैक्षणिक, आर्थीक, कला क्रिडा, राजकीय क्षेत्रातील निवड, डॉक्टर, वकील, इंजिनिअर अधीकारी पदन्नोती असे अनेक विषय आणि श्री . संताजी महाराजांची ओळख शिवाय ओबीसी ची संपुर्ण माहिती समाजासाठी सुविधा प्रसिद्धीस देण्याचे खरे व्यासपीठ म्हणजे तेली गल्ली हे होय. अगदी तळागाळातील, प्रत्येक समाज बांधवांपर्यंत सर्व माहिती बिनचुक पोहचविण्याच काम श्री. मोहन देशमाने यांनी तेली गल्ली या मासिकाद्वारे केलेले आहे. 

     प्रत्येकाच्या सुखदु:खात या प्रसार माध्यमातुन आपण सहभागी होऊ शकतो याची दखल आपण सर्व समाज  बांधवांनी घेतली पाहिजे या मासिकाचे वर्गणीदार - जाहिरातदार सभासद संख्या वाढण्याची अपेक्षा बाळगतो सर्वांनी तन, मन, धनाने मदत केली पाहिजे सामाजीक बांधीलकी म्हणुन तेली गल्ली या मासिकाचे सदस्य अधीक प्रमाणात व्हावेत सर्व समाज बांधव वर्गणीदार यांना प्रत्येक महिन्यात घरोघर हे मासिक मिळावे. आणी सर्व समाज तेली गल्ली या मासिकाच्या प्रेमात  पडावा हिच अपेक्षा बाळगतो.

     श्री. मोहन देशमाने यांना पुढील, कारकीर्द सुख समृद्धीची भरभराटीची, अरोग्य व आर्थीक दृष्ट्या मजबुत जावो तेली गल्ली मासिकाचे वर्गणीदार जाहिरातदार वाढो

 या साठी गरज आहे आपल्या सहकार्याची
     गरज आहे आपल्या प्रेमाची 
     गरज आहे आपल्या आशिर्वादाची
 आणि हे सर्व साध्य करायचे असेल तर गरज आहे आपल्या सर्वांची

 श्री. रमेश सदाशिव भोज
 अध्यक्ष :- संताजी सेना पुणे, जिल्हा.
 सचिव :- तिळवण तेली समाज, ८२ भवानी पेठ, पुणे
 अध्यक्ष :- ओबीसी महासभा पुणे शहर
 संघटक :- संताजी प्रतिष्ठाण कोथरूड, पुणे 
 मो. नं. ९६०४७६७०६८

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran