Bride / Groom Form

माण तालुका तेली समाज दहिवडी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

06 February 2018 sant santaji maharaj jagnade 108 views

    माण तेली समाज दहिवडी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना   सोहळा दहिवडी तिळवण तेली समाज संघ दहिवडी  शहर  यांनी आयोजित केला आहे. मिकी माघ वद्य 7 शके 1939 बुधवार दिनांक 7 2 2018 रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजता श्री संत जगनाडे महाराज मंदिर जुना शिगंनापूर रोड दहिवडी तालुका माण इथे होईल. कार्यक्रम शुभहस्ते 108 परम पूज्य श्री महंत सुंदरगिरी महाराज मठाधिपती सेवागिरी देवस्थान पुसेगाव यांच्या शुभहस्ते होईल.  या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती  माननीय आमदार जयकुमार गोरे,   श्री अतुलदादा जाधव माजी सभापती पंचायत समिती  माण,  सौ. साधना गुंडगे, नगराध्यक्ष नगरपंचायत दहिवडी,  श्री दिलीपराव जाधव उपनगराध्यक्ष नगरपंचायत दहिवडी,   इत्यादी असतील.

  कार्यक्रमाचे स्वरूप  

       मंगळवार दिनांक 6 2 2008 रोजी दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत श्री संत संताजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक नगरप्रदक्षिणा.   बुधवार दिनांक 7 2 2011 रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत मंदिर पूजन सर्व देवांना पूजन,  सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत  होमहवन,  दुपारी दोन ते तीन 3 वाजेपर्यंतची  श्रींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व आरती,  दुपारी 3:30 नंतर महाप्रसाद कार्यक्रम होईल.  

    संत संताजी महाराज जगनाडे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने तेली समाज बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती श्री संजय शेडगे,  श्री वसंत लक्ष्मण खर्शीकर,  श्री अनिल जगन्नाथ क्षीरसागर,   श्री पोपटराव गवळी, श्री देवीदास उर्फ पोपट राऊत,  श्री काशिनाथ चंद्रकांत किर्वे,   श्री दत्तात्रेय नथुराम देशमाने,  श्री सुरेश किर्वे,   श्री. रघुनाथ दळवी, श्री. संदिप गजानन किर्वे, श्री. सुर्यकांत नमादेव दळवी, श्री. गण्‍ेश्‍ महादेव दळवी, श्री. रामचंद्र भिसे  श्री संत संताजी जगनाडे महाराज  तिळवण तेली समाज,  दहिवड तालुका माण, श्रीदत्त गणेश मंडळ तेली गल्ली दहिवड इत्यादींनी केली आहे.    

maan Taluka Dahiwadi Teli Samaj Sant Santaji Maharaj Jagnade pratishthapana

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu