वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची बैठक.

15 March 2015 Teli samaj 116 views

Ramdas Tadas popatrao gawali, teli mahasabha      महाराष्ट्र प्रांतीक तेली  समाज महासभा या आपल्या संघटनेतील पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची म्हणजे सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापुर जिल्हा, कोल्हापुर जिल्हा. तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील बारामती तालुका, दौंड तालुका, इंदापुर तालुका या पश्‍चिम महाराष्ट्र विभागाची बैठक रविवारी दिनांक २२ मार्च २०१५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केली आहे. सदर बैठकीस विभागीय पदाधिकारी, विभागातील सर्व जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ते येणे आवश्यक आहे. संघटनेचे राज्यस्तरीय वरीष्ठ पदाधिकारी मा. खासदार रामदासजी तडस, (प्रदेश अध्यक्ष), मा. गजानन नाना शेलार (कोषाध्यक्ष), मा. डॉ. भुषण कर्डीले (महासचिव), हे सदर बैठकीस उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
 


 बैठकीचे ठिकाण  :-  विसावा रिसॉर्ट कोयनानगर 
 तालुका  - पाटण  :-  जिल्हा सातारा
 भोजन व्यवस्था :-  व्हेज व नॉनव्हेज बैठकीच्या ठिकाणीच आहे.
 बैठकीची वेळ :-  सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत  (सकाळी येऊन सायंकाळी परत जायचे आहे.)
 
 व्यवस्था व आयोजन
 मा. श्री. संजय शेंडगे,  सातारा जिल्हा अध्यक्ष
 
 निमंत्रक
 मा. श्री. पोपटराव गवळी, विभागीय अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र विभाग
 मा. श्री. संजय विभुते, विभागीय युवा अध्यक्ष,  पश्चिम महाराष्ट्र विभाग
 मा. श्री. जयसिंग दळवी, विभागीय उपाध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र विभाग

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar