वधु - वर फॉर्म

श्री संताजी महाराज जगनाडे पालखीचे हडपसरला स्वागत.

21 August 2016 sant santaji maharaj jagnade 0 views

    हडपसर : जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग व गाथा लेखक श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासात हडपसर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.  
    दुपारी 3 वाजता शामराव भगत यांच्या निवासस्थानी पालखी सोहळ्याचे आगमन झाले.  
    या वेळी संताजी तेली समाज हडपसरचे पदाधिकारी प्रितम केदारी, कुंडलीक देशमाने, अप्पा किरवे, रमेश डाफे, श्यामराव भगत, सुनील क्षीरसागर व इतर कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. या वेळी परिसरातील भाविकांनी दर्शन घेतले.  
    आलेल्या वारकर्‍यांसाठी व भाविकांसाठी महाप्रसदांचे आयोजन करण्यात आले होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana