वधू - वर फॉर्म

तेली समाज शहादा निषेध मोर्चा

25 February 2018 Teli samaj 101 views

      तेली समाज शहादा -  दोंडाईचा येथील ६ वर्षीय बलिकेवर अमानुष अत्याचार करुन तिच्या आई-वडिलांना धमकी देणा-यांनी त्वरित अटक करायी या मागणीसाठी शहादा येथील समस्त हिंदू तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.

      दोंडाईचा येथील महादेवपुरा परिसरातील ६ वर्षीय बलिकेवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करणा-या नराधमांवर व  धमकी देनारयावर कठोर कारवाई करावी व बालिकेस न्याय मिळवून देण्यासाठी शहादा येथील तैलिक मंगल कार्यालयापासून मुख्य रस्त्यावरुन शहादा पोलीस ठाण्यावर समस्त हिंदू तेली पंच मंडळ शहादा तालुकातर्फ निषेध मोर्चा काढून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या मोर्चा अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. योगेश चौधरी, भरत चौधरी, संजय चौधरी, सुभाष चौधरी, गिरधर चौधरी, यशवंत चौधरी, विनोद चौधरी, हिरालाल चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, रमण चौधरी, दिलीप चौधरी, प्रा. सदाशिव चौधरी, दशरध चौधरी, देविदास चौधरी, प्रविण चौधरी आदी उपस्थित होते, शहादा तेली समाजाच्या वतीने पीडित कुटुंबाला ३ हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली. 

Teli Samaj Shahada nished morcha

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia