वधू - वर फॉर्म

अत्‍पवयीन मुलीवर आत्‍याचार प्रकरणी तेली सामाज औरंगाबाद ची फाशीची मागणी

25 February 2018 Teli samaj 97 views

        औरंगाबाद । धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारया नराधमांना फाशी देण्याची मागणी जय संताजी युवा मंच, तेली समाज औरगाबाद, तेली युवा संघटना, राष्ट्रवादी ओबीसी आघाडी, आमदार अतुल सावे मित्रमंडळ, युवा क्रांतीतर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे करण्यात आली. भापकरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ, हेमंत देशमुख, रवींद्र देशमुख, महेंद्र आधार पाटील, शरद महाले, नंदू सोनवणे यांनी अत्याचार केला. त्यांनी पीडितेच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबावही आणला. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी. निवेदन देताना सोमनाथ सुरडकर, प्रवीण वाघलव्हाळे, सुनील क्षीरसागर, अनिल क्षीरसागर, गजानन सोनवणे, दत्ता भोलाणे, प्रमोद ठोंबरे, ईश्वर पेंढारे, कृष्णा पेंढारे, बापू सोनवणे, नंदू बसैये, अशोक क्षीरसागर, राजू सोळंके, योगेश मिसाळ, विशाल नांदरकर, विनोद मिसाळ, अनिल साळवे, विलास ढंगारे, अमित जगताप, विनायक पशरकर, संतोषसुरुळे, सुनील मिसाळ, अभिजित साळवे, शिवाजी भगुरे, अतुल तुपे, योगेश चौधरी, कुणाल रुधसमुद्र तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष गजानन सोनवणे, जिल्हाध्यक्ष विलास ढंगारे, संदीप घोडके, मराठवाडा सोशल मीडिया सचिव जावेद खान, शहराध्यक्ष विलास मगरे, सरचिटणीस विनायक पाराशर चांगदेव हिगे, गणेश अंबेकर, संतोष सोनवणे उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu